बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

जळगाव जामोद तालुक्यामधील भिंगारा, चाळीस टपरी ,आणि गोमाल परिसरातील आदिवासी बांधवांचे विविध मागण्यासाठी आमरण उपोषण सुरू!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,

संग्रामपूर तालुका प्रतिनिधी ,

रतन भगत.

जळगाव जामोद, दि.२९/९/२६ सविस्तर वृत्त असे की जळगाव जामोद तालुक्यातील भिंगार, चाळीस टपरी, आणि गोमाल परिसरातील आदिवासी नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी बेमुद्रा आंदोलन व आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. परिसरातील रस्ता, आरोग्य सुविधा, सर्पद विषयावरील उपचार,,, तसेच आदिवासी कुटुंबांच्या विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलन कर्त्यांनी मांडलेल्या माहितीनुसार भिंगरा गावापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावरील आदिवासी पाडा चाळीस टपरी येथे जाण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांना अडचणींना सामना करावा लागत आहे. याच मार्गावर गर्भवती महिला तसेच आजारी नागरिकांना दवाखान्यात देण्यासाठी ही अडचणी निर्माण होत असल्याचे आंदोलन कर्त्यांचे म्हणणे आहे.२४ तास आरोग्य सुविधा व सर्पदोषावरील लसीची मागणी भिंगारा उपकेंद्रात २४ तास डॉक्टर नर्स तसेच रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्याचे मागणी सुद्धा परिसरातील नागरिकांनी केली आहे. जळगाव जामोद सरकारी दवाखान्यात सर्पद अंशावरील लस उपलब्ध करून द्यावी तसेच परिसरातील आदिवासी नागरिकांना उपचारासाठी दूरवर जाऊ लागू नये अशी मागणी ही करण्यात आली आहे.वीज वनपट्टे आणि आर्थिक मदतीचे प्रश्नधिंगारा चाळीस टपरी आणि गोमाल या गावांमध्ये तातडीने वीज सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. तसेच वनपट्ट्यांच्या वाटपाबाबत महसूल विभागाकडून कार्यवाही करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे. आंदोलन करते आणि पिढीचा परिवारांना आर्थिक मदत मुलांच्या शिक्षणासाठी तसेच उदरनिर्वाहासाठी शासनाकडून योग्य ती मदत मिळावी अशी मागणी सुद्धा मांडली आहे. प्रशासनाने मागण्यांची दखल घ्यावी आंदोलन कर्त्याच्या म्हणण्यानुसार परिसरातील आदिवासी नागरिकांना अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. रस्ता, आरोग्य, विज, पाणी, शिक्षण आणि वन हक्काशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. भिंगारा चाळीस टपरी आणि गोमाल सह परिसरातील आदिवासी नागरिकांच्या विविध मागण्यांवर प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button