बुलढाणामहाराष्ट्र

दुष्काळग्रस्त शेतक-यांसाठी श्री गजानन महाराज संस्थान, शेगावकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 1कोटी 11लाखांची मदत

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी :गजानन तांगडे, खामगांव

शेगाव :राज्यातील शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव यांनी सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 1कोटी 11 लाख रुपयांचा मदत निधी सुपूर्द केला आहे.प्रेसनोटमध्ये नमूद केल्याप्रमाणे, राज्यातील काही भागांमध्ये पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीसमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा मोठा फटका शेतकन्यांना बसला आहे. पावसाअभावी किंवा प्रतिकूल हवामानामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
या पार्श्वभूमीवर दुष्काळामुळे बाधित झालेल्या शेतकन्यांना मदत मिळावी, त्यांना संकटाच्या काळात आर्थिक आधार मिळावा आणि शासनाच्या मदतकार्याला हातभार लागावा, या उद्देशाने श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रु. 1कोटी 11लाखांचा धनांदेश देण्यात आला. हा निधी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे धनादेशाब्द्वारे सुपूर्द करण्यात आल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद आहे. या मदतीमुळे संकटग्रस्त शेतकन्यांना दिलासा मिळण्यास मदत होणार असून, संस्थानच्या या सामाजिक उपक्रमांचे महत्व अधोरेखित झाले आहे.शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यस्थेचा महत्वाचा आधार असून, नैसर्गिक संकटांच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. याच सामाजिक जाणीवेतून श्री गजानन महाराज संस्थानने मुख्यमंत्री सहाय्यता निधींस दिलेला हा मोठा हातभार शेतकरी मदतकायांसाठी उपयोगी ठरणार आहे.श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव हे धार्मिक कार्यासोबतच विविध सामाजिक उपक्रमांमध्येही योगदान देत आले आहे. शेतकऱ्यांना साठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिलेली 1 कोटी 11लाख रुपयांची मदत ही त्याच सामाजिक बांधिलकीचा एक भाग असल्याचे प्रेसनोटमधून स्पष्ट होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button