दुतोंडे कुटुंबीयावर दाखल करण्यात आलेले दंगलीचे खोटे गुन्हे मागे घ्या..!

हिवरखेड येथील सामान्य नागरिकांचे ठाणेदारांना निवेदन
हिवरखेड :- काही दिवसापूर्वी नगर परिषदेच्या सभागृहात व्हिडिओ रेकॉर्डिंग वरून नगरपरिषद समोरील रस्त्यावर दोन गटात मारहाण झाली या मारहाणीत भाजप नेते रमेश दुतोंडे व त्यांच्या कुटुंबीयांवर दाखल करण्यात आलेले दंगलीचे खोटे गुन्हे मागे घेण्याबाबत आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी सामान्य नागरिकांच्या वतीने हिवरखेड ठाणेदार सचिन पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. रमेश दुतोंडे हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून त्यांनी पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, आत्मा समिती अध्यक्ष, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष अशी विविध पदे भूषविली आहेत तसेच त्यांच्या पत्नी ह्या हिवरखेडच्या सरपंच व अकोला जिल्हा परिषदेच्या सदस्य राहिल्या असून आज रोजी त्या हिवरखेडच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून विराजमान आहेत रमेश दूतोंडे यांचे मुले व भाऊ हे सुद्धा आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडत आहेत रमेश दुतोंडे यांच्या एवढ्या प्रदीर्घ काळाच्या राजकारणात त्यांच्यावर एकही दंगली सारखा गंभीर गुन्हा दाखल झालेला नसून त्यांची भूमिका नेहमीच वाद सोडविण्याची असते. त्यामुळे नगरपरिषद समोरील रस्त्यावर दोन गटात झालेल्या मारहाणीत रमेश दुतोंडे व गणेश दुतोंडे व त्यांच्या कुटुंबीयांतील सदस्य सदर मारहाणीत सीसीटीव्ही फुटेज मध्ये आवरा आवर करताना दिसत आहेत त्यामुळे त्यांचा प्रत्यक्ष मारहाणीत सहभाग नसल्यामुळे त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले दंगलीचे खोटे गुन्हे मागे घेण्याबाबत आज ठाणेदार सचिन पाटील यांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर अरुण हिवराळे, रमेश देऊळकर, मंगेश ताडे, दिवाकर वानखडे, विनोद ढबाले, सुरेश भोंडे, रामदास गावंडे, वासुदेव इंगळे, बाबुराव वाकोडे, संतोष शर्मा, सुधाकर गावंडे, दशरथ गावंडे, स्वप्निल नाठे, प्रमोद निळे, सचिन इंगळे, अन्सारोद्दीन बाहोद्दीन यांच्यासह सामान्य नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी अकोला, जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला, उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट, यांना सुद्धा देण्यात आले आहेत.











