जामोद येथे चक्रधर स्वामींची 108 वि जयंती मोठ्या उत्साहात दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम असंख्य भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी हरिदास इंदोरे जळगांव जामोद
जामोद येथील दत्त मंदिरात शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी चक्रधर स्वामींची 108 वी जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळपासूनच मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही जयंतीनिमित्त पहाटे 4 वाजता चक्रधर स्वामींच्या देवस्नान चा कार्यक्रम पार पडला त्यानंतर विधिवत पूजा अर्चना करण्यात आली. धार्मिक विधी नंतर आरती करण्यात आली यावेळी मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भरून गेला होता. यानंतर दुपारी 12 वाजेपासून भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. दुपारपासून सुरू झालेला महाप्रसादाचा कार्यक्रम उशिरापर्यंत सुरू होता. जामोद येथील असंख्य भाविकांनी चक्रधर स्वामींचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला जयंतीनिमित्त दिवसभर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण पाहावयास मिळाले वरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुण भाऊ पारस्कार(पाटील ) संपूर्ण पारस्कार परिवार जामोद व श्री दत्त मंदिराचे सदस्य तसेच गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले



