खानदेशबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

दि. २६ सप्टें. ते २७ सप्टें. रोजी तेल्हारा तालुक्यात १६० मतदान केंद्रावर विशेष मतदार शिबिरा बाबत महेश रामगुंडे तहसीलदार तेल्हारा यांचे महत्त्वपूर्ण आवाहन!

आवाज न्यायाचा प्रतिनिधी स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

विजय मनोहरराव घोडे

अकोला/ तेल्हारा
दि.२५ सप्टें. : मा. मुख्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र राज्यामध्ये मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दि.३१ ऑगस्ट, २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ हा कालावधीत दावे व हरकती सादर करण्याकरीता निश्चित करण्यात आलेला आहे. या कालावधीमध्ये नागरिकांकडून नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नोंदीच्या दुरुस्ती व नाव वगळणीसाठी अर्ज सादर करण्यात येणार आहेत.

त्याअनुषंगाने अकोट – २८ विधानसभा मतदार संघ अंतर्गत तेल्हारा तालुक्यातील एकुण १६० मतदान केंद्रावर शनिवार दि. २६/०९/२०२६ व रविवार दि. २७/०९/२०२६ रोजी या दोन दिवसाकरीता दिनांक ०१/१०/२०२६ या अहर्ता दिनांकावर वय १८ वर्ष पूर्ण झाले असेल अशा मतदारांचे नाव मतदार यादीत नोंदविण्याकरीता विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

विशेष शिबिरा अंतर्गत आवश्यक लागणारे कागदपत्र खालील प्रमाणे आहेत

नमुना – ६
(नविन नाव समाविष्ट करण्याकरीता)

१) फोटो

२) जन्म तारिख पुरावा (शाळेचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी)
३) रहिवासी पुरावा . आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स ,विदयुत बिल, बैंक पासबुक इत्यादी)

४) सन २००२/२००४ च्या मतदार यादीतील आई/वडील/आजी/आजोबा यांना नावाची नोंदीबाबत पुरावा.

५) नातवाईकांचे मतदान कार्डची झे.

नमुना- ७
( नाव वगळणी करीता)

१) मतदान कार्डाची झेरॉक्स प्रत किंवा क्रमांक,

२) आधार कार्डाची झेरॉक्स प्रत

नमुना ८
(दुरुस्ती करीता)

१) मतदान कार्डाची झेरॉक्स प्रत किंवा क्रमांक.

२) दुरुस्ती बाबत आवश्यक दस्तऐवज योग्य पुराव्याची प्रत.

३) रहिवासी पुरावा (आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स ,विदयुत बिल, बैंक पासबुक झेरॉक्स इत्यादी)

३) मतदार यादीतील नाव इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याकरिता आवश्यक रहिवासी पुरावा – आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, विद्युत बिल, बँक पासबुक इत्यादी.

तरी तेल्हारा तालुक्यातील वय १८ वर्ष पूर्ण झालेल्या अथवा होत असलेल्या तरुण-तरुणींनी आपले नाव मतदार यादीत नोंदवून त्याचे प्रमाणपत्र जास्तीत जास्त संख्येने मिळवून घ्यावे असे आवाहन तेल्हारा येथे कर्तव्यपथावर असलेले तहसीलदार महेश रामगुंडे यांच्याकडून नुकतेच करण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button