खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्ररावेर

ढोल-ताशांचा गजर, आकर्षक देखावे आणि भक्तिमय वातावरणात गणपती विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
आवाज न्यायचा
रावेर ता. प्रतिनिधी – विकास आमोदकर

रावेर शहरातील गणपती विसर्जन मिरवणूक उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात शांततेत पार पडली. ढोल-ताशांचा गजर, आकर्षक देखावे आणि गणेशभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

गणरायाला निरोप देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विविध गणेश मंडळांनी सजविलेल्या आकर्षक देखाव्यांसह मिरवणुकीत सहभाग घेतला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी शिस्त व शांतता कायम ठेवली. पोलिस प्रशासन, स्वयंसेवक आणि संबंधित यंत्रणांनी चोख नियोजन करत सुरक्षेची विशेष काळजी घेतली. त्यामुळे विसर्जन सोहळा सुरळीतपणे पार पडला.

शांततेत आणि उत्साहात गणरायाला निरोप देत रावेरकरांनी गणेशोत्सवाची सांगता केली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button