Uncategorized

दिवाळी साजरी करा पण काळजी घ्या.मालेगाव पोलीस निरीक्षक संजय चौधरी

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव : – दिवाळी हा सण दिव्यांचा आहे, फटाक्यांचा नाही त्यामुळे पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करून नागरिकांनी आपली व पर्यावरणाची काळजी घ्यावी.
सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे,दिवाळी हा सण दिव्यांचा असला तरी तो फटाक्यांच्या अतिवापरामुळे अपघातांचा होऊ नये,याची काळजी घेणे आवश्यक आहे पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करून, सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन मालेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय चौधरी यांनी केले आहे “दिवाळी सणाच्या जल्लोषात फटाके एकमेकांच्या अंगावर फोडणे टाळावे, त्यामुळे अनावश्यक दुखापत होऊ शकते,” असे त्यांनी सांगितले जीवन एकदाच मिळते आणि ते अमूल्य आहे,म्हणून अनावश्यक धोका टाळावा,अशी सूचना त्यांनी नागरिकांना दिली आहे दिवाळी सणासुदीच्या काळात महिलांसाठी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे,अनेकदा चोरटे गर्दीचा फायदा घेत,सुसाट बाईकवर येऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत व इतर मौल्यवान दागिने तोडण्याचे प्रकार वाढतात,बसमधील गर्दीच्या वेळी,रस्त्याने प्रवास करताना किंवा सार्वजनिक ठिकाणी दागिने चोरीला जाण्याच्या घटना घडतात महिलांनी प्रवासादरम्यान गळ्यातील चैन, दागिने नीट सांभाळावे,तसेच गावी जाताना दागिने घरात ठेवण्याऐवजी बॅंकच्या लॉकरमध्ये ठेवण्याचीही सूचना देण्यात आली आहे यामुळे दिवाळीच्या सणात चोरीसारख्या घटनांपासून संरक्षण मिळू शकेल निरीक्षक चौधरी यांनी फटाक्यांचा वापर करताना कोणत्याही प्रकारे आगीची घटना घडणार नाही, याची काळजी घ्यावी. “दिवाळीच्या जल्लोषात फटाके एकमेकांच्या अंगावर फोडू नयेत,कारण त्यामुळे अपघात होऊन दुखापत होण्याची शक्यता असते तसेच स्वैरपणे फटाके फोडल्यास घर किंवा दुकानांना आग लागण्याची शक्यता असते,म्हणून आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे अनावश्यक आतिषबाजी टाळावी,कारण त्यामुळे पर्यावरणाचा आणि अपघाताचा धोका वाढतो “ही दिवाळी आनंदमय,सुरक्षित,आणि पर्यावरणपूरक जावो,” असे म्हणत त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या असून,सुरक्षिततेच्या दृष्टीने जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button