बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
बनावट व अवैद्य दारू विक्रेत्यावर कारवाई कराराष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांची मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
देऊळगावराजा : प्रतिनिधी :–शंकर शिवरकर
तालुक्यात बनावट व अवैद्य दारू विक्रीचा सुळसुळाट वाढला आहे. नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या अशा बनावट व अवैद्य दारू विक्री करणाऱ्या समाजकंटकावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा आणि उत्पादन शुल्क कायद्यानुसार कठोर कारवाई करावी,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांनी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केली आहे.
राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष यांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, देऊळगाव राजा तालुक्यात अनेक ठिकाणी विनापरवाना छुप्या मर्गाने अवैद्य दारू विक्री सरासपणे सुरू आहे. परमिट रूम शिवाय अन्य कोणत्याही ठिकाणी परवानगीशिवाय दारू विक्रीची आणि मद्यपानाची सोय करता येत नाही, तरी देखील तालुक्यात अनेक ठिकाणी अवैद्यरित्या तशी सोय करून दिली जात आहे.त्यामध्ये विषारी बनावट दारूची विक्री मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.अशा प्रकारच्या बनावट दारूमुळे नागरिकांच्या आरोग्याला आणि सुरक्षितेला धोका निर्माण झाला आहे. बनावट विषारी दारूमुळे अनेक जीव घेण्या घटना घडत आहे.तालुक्यात काही ठराविक परिसरात तसेच निवासी वस्त्यांमध्ये अवैद्य व बनावट दारू विक्री करण्याचे प्रकार सुरू आहे. त्याचा परिणाम तरुण पिढीवर व सामाजिक वातावरणावर होत आहे. दारू वरील कर वाढवल्यानंतर दारूच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे तालुक्यात बनावट दारूचा सुळसुळाट झाल्याचे चित्र आहे. पोलीस व राज्य उत्पादन शुल्क या यंत्रणांनी केवळ अधून मधून कारवाई न करता दारूची नियमित तपासणी व गुप्त माहिती संकलित करून प्रतिबंधात्मक उपाय योजना अधिक प्रभावीपणे राबवाव्यात. तसेच बनावट व बेकायदेशीर दारू विक्री विरोधात कठोर भूमिका घेत दोशींवर कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे केली आहे.



