बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

अनुसूचित जाती आरक्षणात उपवर्गीकरणाला राज्यासह चिखलीत तीव्र विरोध५८ जातीची एकता तोडणारा काळा निर्णय रद्द करा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी चिखली:-सलमान पठाण

दिनांक:-२२/०६/२०२६
वार-सोमवार
तालुका चिखली जिल्हा -: महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आरक्षणात उपवर्गीकरण लागू करण्याच्या हालचालींना चिखलीतून तीव्र विरोध नोंदविण्यात आला आहे. अनुसूचित जाती समाजाच्या वतीने मख्यमंत्री महोदयांना तहसीलदार चिखली यांच्या माध्यमातुन निवेदन सादर करून हा प्रस्ताव संविधानविरोधी आणि सामाजिक ऐक्याला धक्का देणारा असल्याचा आरोप करण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, अनुसूचित जातींची यादी जाहीर करणे किंवा त्यात कोणताही बदल करणे हा अधिकार संविधानाच्या अनुच्छेद ३४१ नुसार महामहिम राष्ट्रपती आणि संसदेकडे आहे. राज्य सरकारला SC समाजात उपवर्गीकरण करण्याचा कोणताही संविधानिक अधिकार नाही. अशा प्रकारचा निर्णय घेतल्यास अनसूचित जाती समाजात फूट पडून सामाजिक आणि राजकीय ताकद कमकुवत होइल असा इशारा देण्यात आला आहे समाज प्रतिनिधींनी स्पष्ट केले की. Sc आरक्षण हे संपूर्ण समाजाच्या सामाजिक न्यायासाठी आहे. त्याचे तुकडे करणे म्हणजे संविधानातील समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मुल्यांवर आघात आहे महाराष्ट्रतील अनुसूचित जातीतील ५९ जातींपैकी ५८ जातींमध्ये या उपवर्गीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
या निवेदनाद्वारे राज्यात Sc आरक्षणाचे उपवर्गीकरण लाग करू नये. गठीत समितीचे काम तात्काळ स्थगित करावे, निर्णय घेण्यापूर्वी अनुसूचित जाती आयोग, न्याय तज्ज्ञ आणि समाज प्रतिनिधींची सार्वजनिक सुनावणी घ्यावी. अशी मागणी करण्यात आली. तसेच जातनिहाय सामाजिक. शैक्षणिक आणि आर्थिक सर्वेक्षण करून शासकीय व निमशासकीय सेवांमधील अनुशेष पदे तात्काळ भरण्याचीही मागणी करण्यात आली.
“एकता हीच शक्ती आहे आणि विभाजन हा पराभवाचा मार्ग आहे, ” असा निर्धार व्यक्त करत समाजाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आधार घेत sc समाजाला एकत्र ठेवणारी भूमिका सरकारने घ्यावी, अशी ठाम मागणी केली आहे.
तसेच सदर मागणी पूर्ण न झाल्यास जिल्हा व तालुका स्तरावर मोर्चा काढण्यात येईल असे निवेदनकर्तेनी ठामपणे सांगितले आहे.
यावेळी अनुसूचित जातीचे प्रतिनिधी म्हणून तालुक्यातील सर्व आंबेडकरी पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, युवा तरुण मोठया संख्येने उपस्थित होते. तर चर्मकार महासंघाचे जिल्हा व तालुक्यातील सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. निवेदनावर शेकडो समाज बांधवाच्या सह्या आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button