बुलढाणामहाराष्ट्रमुबईसामाजिक

त्रिगुणी गणेश मंडळाच्या वतीने वृक्षरोपण.,.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी हरिदास इंदोरे जळगाव जामोद

त्रिगुणी गणेश मंडळातर्फे 29 ऑगस्ट रोजी आयोजित वृक्षरोपणाच्या कार्यक्रमांमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी व तसेच मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. आसलगाव येथील युवकांनी हा एक अनोखा उपक्रम राबविला आहे. यामध्ये त्यांनी रक्तदान शिबिर तसेच वृक्षरोपण कार्यक्रम व विविध वेगवेगळे समाज उपयोगी कार्यक्रम यावर्षी गणेश मंडळातर्फे राबविण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्ते व सार्वजनिक बांधकाम अभियंता भेलके साहेब यांच्या संकल्पनेतून वृक्षरोपण अभियान राबवून सामाजिक बांधील की जपत 25 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. हा समाज उपयोगी कार्यक्रम राबवल्या बाबत गावकऱ्यांकडून कौतुक करण्यात आले. वृक्षरोपण कार्यक्रमाकरिता वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक जळगाव जामोद अधिकारी निलेश काळे, खाडवी वर्तुळ चे वनपाल व्हिबी पाथरीकर, वनरक्षक अनिल बारगीर साहेब, वनरक्षक निकाळजे साहेब, वनरक्षक धवसे साहेब, वन मजूर भगवान जामुनकर, महिंद्रा तायडे, नरेश खाडपे, गणेश तायडे तसेच मंडळाचे अध्यक्ष खापट तसेच शाळा समितीचे अध्यक्ष भगवान भाऊ टापरे, भाजपा जिल्हा सरचिटणीस तसेच ज्येष्ठ नेते श्रीकृष्ण भेलके, साहेब विविध कार्यकारी संचालक विठ्ठल भाऊ चांदणे व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच मंडळाचे कार्यकर्ते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button