त्या.. घटनेच्या निषेधार्थ भाजपा महिला आघाडी च्या वतीने सायलेंट कॅन्डल मार्च काढून निषेध व्यक्तस्टार भारत लाइव बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतीनीधी ऋषिकेश देठे

खामगांव / नांदुरा ::- पश्चिम बंगालमध्ये डॉक्टर वर सामूहिक बलात्कार करून अतिशय क्रूरपणे तिची हत्या करण्यात आली.या घटनेचा तीव्र निषेध खामगाव जिल्हा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने करीत खामगाव व नांदुरा येथे सायलेंट कॅन्डल मार्च करण्यात आला.
ममता बॅनर्जीच्या पोलिसांनी या अतिशय निर्दयी घटनेला आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केले.
उच्च न्यायालयाने हा प्रकरण सीबीआय कडे देण्याचे आदेश दिल्यावर TMC च्या कार्यकर्त्यांनी बलात्कार झालेल्या ठिकाणाचे तोडफोड करून पुरावे नष्ट करण्यात आले.
महिला मुख्यमंत्री असलेल्या पश्चिम बंगालमध्ये सामान्य महिला सुरक्षित नाहीत, तिथे वारंवार अशा बलात्काराचे प्रकरण घडत आहेत, आणि तिथलं सरकार प्रकरण दाबून आरोपींना पाठीशी घालत आहे.
या अतिशय गंभीर अत्याचार विरोधात भाजप महिला आघाडीच्या वतीने खामगाव व नांदुरा येथे दि.16 ऑगस्ट ला संध्याकाळी मेणबत्ती घेऊन “सायलेंट कॅन्डल मार्च” काढून निषेध नोंदविण्यात आला. खामगाव येथे भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य सौ अनिताताई देशपांडे, पश्चिम विदर्भ पंचायत राज अभियानाच्या संयोजिका सौ रत्नाताई डीक्कर, बेटी बचाव बेटी पढाव अभियान जिल्हा संयोजिका सौ जान्हवी कुळकर्णी, खामगाव महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सौ शिवानी कुळकर्णी, माजी नगराध्यक्ष अनिताताई डवरे, सौ श्रद्धा धोरण, सौ भक्ती वाणी, सौ ज्योती पवार, सौ शुभांगी हातेकर, कु. मृणाल इंगळे, कुं सर्वेशा कुळकर्णी, कू स्वाती जुमळे आदी महिलांची उपस्थिती होती.
तर नांदुरा येथे भाजपा महिला मोर्चा यांचेसोबत आय एम ए, लॉयन्स क्लब, लॉयन्स क्लब ज्ञानगंगा, एम आर असो., जनरल मेडिशियन, ओम साई फाऊंडेशन, राजस्थानी माहेश्वरी महिला मंडळ आदी संघटनांनी सहभाग घेतला. यावेळी भाजपा महिला आघाडी खामगाव जिल्हाध्यक्षा सौ सारिका ताई डागा, डॉ राजेंद्र गोठी ,
डॉ विजय सिंगजी मोहता,
डॉ बोडसे,
डॉ एस बी वानखेडे ,
डॉ विवा देशमुख ,
डॉ विनोद रामचंदानी,डॉ हिंगे ,
डॉ विजय तायडे ,
डॉ बोंद्रे,
डॉ चोपडे,
शैलेश मिरगे ,
अमोल डहाके ,
संजू घाटे ,
महेश पांडे ,
ऋषिकेश इंगळे ,कल्याणी इंगळे
शहराध्यक्ष भाजप महिला मोर्चा अनिताताई चौधरी ,
रुबीना ताई पटेल
प्रदेश सचिव भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र,
किरण ताई वेरूळकर सरचिटणीस भाजप महिला मोर्चा नांदुरा शहर,
रेणूताई डागा,
पुष्पाताई चंदनगोळे
उपाध्यक्ष भाजप महिला मोर्चा नांदुरा शहर ,
विद्याताई वाणी राष्ट्र सेविका समिती जिल्हा सह कार्यवाहक
रेणूताई डागा ,जयश्रीताई पिंपरी, आरतीताई नवगजे,डॉ संजीवनी नांदुरकर ,डॉ स्नेहल नाफडे ,डॉ गोठीताई,डॉ भरती राठी, डॉ नीता मोहता, डॉ पूजा दमानी , डॉ डवंगे मॅडम ,डॉ बोरसे मॅडम ,डॉ पूजा डागा,सोनल डागा ,हर्षा राठी ,सौ शर्मा ताई ,सौ कल्पना हुरपडे आदींनी उपस्थित राहून या तीव्र घटनेचा निषेध व्यक्त केला. श्रद्धांजली वाहिली व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आणि न्याय द्यावा अशी मागणीही करण्यात आली.



