महाराष्ट्रमुबई

सेंटर फॅसिलिटेटर् – मल्हारी मनोहर साळवे

सेंटर फॅसिलिटेटर् – मल्हारी मनोहर साळवे

बाळू मनोहर साळवे मुंबई बिरो चीप

२३ सप्टेंबर २०२३ शनिवार

किर्तांगली

पार्श्वभूमी – किर्तांगली हे गाव सिन्नर तालुक्यातील एक छोटेसे गाव आहे. हे गाव तालुक्यापासून सुमारे 22 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. या गावची लोकसंख्या सुमारे इतकी आहे. या गावामध्ये कोणत्याही प्रकारची ऑनलाइन सेवा पुरवण्याची सोय उपलब्ध नव्हती. आपल्या सेव्ह द चिल्ड्रन राबवलेल्या नोकिया स्मार्टपुर प्रोजेक्ट मुळे या गावात विविध प्रकारच्या ऑनलाइन सेवा पुरविणे सोपे झाले. ज्या कामासाठी लोकांना दूरवर जाऊन काम करावे लागत होते ते आता गावातच शक्य होत आहे. व त्या सेवा गावामध्ये व आजूबाजूच्या गावांमधील लोकही या सेंटरचा लाभ घेत आहेत. या सेंटरमुळे गावातील व गावाबाहेरील लोकांना सेवा वेळेत मिळते तसेच त्यांचा वेळ वाचतो व पैसेही वाचतात व वेगवेगळ्या योजनांची माहिती या सेंटरमुळे गावातील लोकांना मिळते.संस्थेने
*केस स्टोरी निवडण्याचे कारण * –
किर्तनगळी या गावांमध्ये स्मार्टफोन सेंटरमध्ये मल्हारी मनोहर साळवे हे सेंटर फॅसिलिटीटेटर म्हणून काम पाहत आहेत. ते अतिशय प्रामाणिकपणे त्यांचे काम पाहत आहे. हे काम करत असताना तेथे एक दिवस जमिनीच्या कामासाठी मुंबईवरून लोक त्या गावांमध्ये आले होते. त्या गावांमध्ये ग्रामपंचायत मध्ये गेले असता त्यांना सिन्नर येथे जाऊन कागदपत्रे घेऊन येण्यास सांगितले होते. व त्यावेळी मुंबईवरून आलेल्या लोकांची संख्या खूप जास्त होती. ते एक ट्रॅव्हलर बस व व्हॅन घेऊन मुंबईवरून आले होते. त्यामुळे त्यांना अजून सिन्नरला जाणे व तेथून कागदपत्र आणण्यासाठी खूप वेळ व पैसे द्यावे लागणार होते पण आपल्या सेंटरमुळे या सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे त्यांचे काम वेळेत पूर्ण झाले व त्यामुळे त्यांचा वेळ व त्यांना होणारा त्रास कमी झाला व पैशांची बचत झाली. व एका दिवसात आपल्या सेंटर फॅसिलिटेटर् मल्हारी मनोहर साळवे यांनी योग्य ते सहकार्य करून त्यांचे काम वेळेत व कमी खर्चात पूर्ण करून दिले. त्यांच्या या कामावर खुश होऊन त्या लाभार्थ्यांनी आपल्या सेंटर फॅसिलिटेटर यांना बक्षीस म्हणून कामाच्या व्यतिरिक्त पाचशे रुपये दिले. अशाप्रकारे आपल्या गावाच्या सोबत इतर गावाच्या लोकांना ही सेवा पुरवून मुंबईपर्यंत ही आपल्या सेंटरच्या कामाचा लाभ पोहोचत आहे
सेंटर फॅसिलिटेटर् यांची केसस्टोरी मधील भूमिका –
सेंटर यांची भूमिका या केसस्टोरी मध्ये खूप महत्त्वाची आहे. त्यांचे काम खूप प्रामाणिक आहे. व त्यांच्यावर असणाऱ्या स्मार्टपुर सेंटरच्या प्रति सर्व जबाबदाऱ्या ते खूप प्रामाणिकपणे पार पडतात. आपल्या सेंटर मधील सर्व सेवांची माहिती ते घरोघरी पोहोचून समन्वय साधून लोकांपर्यंत पोहोचवतात. व ते सेंटरला जास्तीत जास्त स्वतःचा वेळ देतात त्यामुळेच वेळेवर या केसस्टोरी मधील मुंबई वरून आलेले लाभार्थी यांची मदत करू शकले. मुंबई वरून आलेले लाभार्थी गावामध्ये दुपारी आलेले होते व त्यावेळीही आपले सेंटर फेसिलिटेटर सेंटरमध्ये उपस्थित होते. त्यामुळेच त्यांनी वेळेवर या लाभार्थ्यांची सेवा पुरवून त्यांची मदत केली. व त्यांचा वेळ, त्यांचा पैसा, व त्यांना होणारा त्रास यामध्ये मल्हारी साळवे यांच्यामुळे कमी होण्यास मदत झाली. त्याप्रकारे सेंटर फॅसिलिटेटर् ची केसस्टोरी मधील भूमिका खूप महत्त्वाची आहे
Save the children संस्थेची casestory मधील भूमिका –
“सेव द चिल्ड्रन” या संस्थेची भूमिका केसस्टोरी मध्ये खूप महत्त्वाची आहे. सेव द चिल्ड्रन या संस्थेने राबविलेल्या स्मार्टपुर प्रोजेक्ट अंतर्गत ज्या 20 गावांमध्ये सेंटर चालू आहेत त्या गावांना खूप लाभ झालेला आहे. त्या गावातील सर्व लोकांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळवून देत आहेत. वेळोवेळी येणाऱ्या योजनांची माहिती गावातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व सेंटर फॅसिलिटेटर्स प्रयत्न करत आहेत. आपल्या गावातील लोकांना सेवा पुरवल्याबरोबरच ते आजूबाजूच्या गावांना सेवा पर्वत आहेत तसेच इतर तालुक्यातील गावांनाही या सेंटर च्या सहाय्याने लोकांना सर्व प्रकारच्या सर्वांचा लाभ मिळवून देत आहे. तसेच महिलांनाही आपल्या स्मार्टपुर प्रोजेक्टच्या सहाय्याने उपजीविकेचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहून घराच्या विकासासाठी हातभार लावण्यासाठी मदत करत आहे. तसेच गावातील मुलांना कम्प्युटरचे ज्ञान मिळत आहे. अशाप्रकारे सेव द चिल्ड्रन या संस्थेच्या कार्यामुळे हे सर्व बदल आपल्या 20 गावांमध्ये घडून येत आहे.

निष्कर्ष –
अशाप्रकारे आपल्या स्मार्टपुर या प्रोजेक्टचे काम यशस्वीपणे आपल्या 20 गावातील स्मार्टफोन सेंटरमध्ये कार्यरत आहेत व त्या गावातील लाभार्थ्यांना सेवा पुरविण्याचे काम करत आहेत जसे मुंबईवरून आलेल्या लोकांना सेंटर फॅसिलिटेटर मल्हारी साळवे यांनी त्यांच्या स्मार्टपुर सेंटरच्या सहाय्याने सेवेचा लाभ मिळवून दिला त्याचप्रमाणे आपल्या इतर 20 गावांमधील स्मार्टपुर सेंटर मधील सेंटर फॅसिलेटरही वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना सेवा पोहोचवत आहे. अशाप्रकारे आपल्या या नोकिया स्मार्टपुर प्रोजेक्ट मधील सिन्नर तालुक्यातील 20 गावांतील स्मार्टपुर सेंटर 20 गावांतील लोकांबरोबरच इतर गावांतील लोकांनाही विविध प्रकारच्या ऑनलाइन सेवांचा लाभ गावोगावी पोहोचवत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button