छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला प्रकरणी दोषीवर कारवाई करा -संभाजी ब्रिगेड मागणी

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
वाशिम – छत्रपती शिवाजी महाराजांचा जलदुर्ग सिंधुदुर्ग शेजारी राजकोट वर आठ महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा एकाएकी कोसळून पडतो ही अत्यंत संतापजनक आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला डाग लावणारी बाब आहे. या पुतळ्याचे उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांनी केलेले होते.भारतीय नौदलाच्या अखत्यारीत या पुतळ्याचे बांधकाम पूर्ण झालेले असताना फक्त नऊ महिन्यात हा पुतळा अपमानास्पद स्थितीत कोसळून पडावा हा संपूर्ण महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा अपमान आहे. त्याचबरोबर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली,कर्तुत्ववान इतिहासाचा सुद्धा अवमान आहे. या भयानक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये तीव्र संताप असून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे आपण अतिशय गांभीर्याने या घटनेची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,त्यांचे सहकारी आणि या घटनेसाठी दोषी असलेल्या सर्वांवर ताबडतोब कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे व त्यांना अटक करण्यात यावी ही संभाजी ब्रिगेडची संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आपणास मागणी आहे.आपण जर ही कारवाई लवकरात लवकर केली नाही तर संभाजी ब्रिगेड छत्रपती शिवरायांच्या या अवमानाविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात फार मोठे आंदोलन उभे करेल. त्यामुळे ताबडतोब दोषींवर कठोर कारवाई करावी.
निवेदन देताना सोबत असणाऱ्या मंडळींची नावे गणेश सुर्वे जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड,
श्रीकृष्ण शिंदे जिल्हा उपाध्यक्ष,
विकास देशमुख जिल्हा प्रवक्ता,
शेख इसाक जिल्हा सचिव,गजानन खंदारे सोशल मीडिया प्रमुख, गजानन व्यवहारे संघटक, ह्या सर्वच्या निवेदनात स्वाक्षऱ्या आहेत. ✍️



