गोळेगाव या ठिकाणी सुरू असलेल्या डांबरीकरण रस्त्याचे काम निकृष्ट आणि अंदाजपत्रकाला तिलांजली देणारे सामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

गोळेगाव या ठिकाणी सुरू असलेल्या डांबरीकरण रस्त्याचे काम निकृष्ट आणि अंदाजपत्रकाला तिलांजली देणारे सामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी
(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे) ठेकेदार बिलाचे पैसे काढून होतात मोकळे सहन करावा लागतो सामान्य नागरिकांना त्शेगाव तालुक्यातील ग्राम गोळेगाव येथील 2018 मधील नव्याने टाकलेला डांबरीकरण रोड गोळेगाव बुद्रुक २ किलोमीटर अंतर असून तेथून गोळेगाव खुर्द ३ किलोमीटर अंतर अशा स्वरूपाचा रस्ता आहे. रस्त्याची लांबी जेमतेम तीन किलोमीटर असून त्यातही लाखो रुपयांचा घोटाळा झालेला दिसतो. पाहणी केली असता असे लक्षात रस्ता एका कडेने पूर्णपणे झुकलेला आहे त्याच्यावर चार चाकी वाहन तीन चाकी वाहन एवढेच नव्हे तर दोन चाकी वाहन सुद्धा नीट चालवणे अशक्य झाले आहे. चालकांना या रस्त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.या ३ किमी ची रस्त्याची किंमत अंदाजे २ एक कोटी ६० लाख दरम्यान होती. परंतु हा रोड ५ वर्षही न टिकता या डांबरी रस्तचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे.दोन्हीही साईडने जोडायचे काम हे अतिशय हलक्या पद्धतीचे करण्यात आलेले आहे त्याच्यावर डांबरीकरण तसेच रुढी माती व लागणाऱ्या अत्यावश्यक गोष्टीचे प्रमाण कमी असल्यामुळे या रस्त्याची नासाडी झालेली आहे.2018 उलटून गेल्यानंतर 2023 ला याच्या पुनर्वसनाची मागणी करण्यात आली होती.उर्वरित तीनशे मीटर रस्ता याचेही वारंवार शासनाकडे मागण्या केल्या.असल्या कारणास्तव त्यावर बांधकाम विभागाने पुढाकार घेतला नाही.एवढ्या वर न थांबता उर्वरित ३०० मीटर रस्त्याच्या कडेला फक्त मुरूम टाकून आपले हाथ वर केलेले दिसत आहे.या रस्त्याने शाळाकरी लहान सहान कधी मुलं, मुली हे आपल्या शाळेत जाण्यासाठी या रस्त्याची पायपीट करून उद्याचे भविष्य ह्रुदयात ठेऊन प्रवास करीत असतात. वाहनांची कोणतीही सुविधा नसल्याने त्यांनाही भरपूर याचा त्रास सहान करावा लागत आहे.शासनाने आमच्याकडे नाही तर भविष्यातील भारताचे भविष्य मनून या पिढीला व त्याच्या शिक्षणाला सार्थक ठरून त्यांना न्याय देण्याचे करावे. बांधकाम विभागाने उघड्या डोळ्यांनी हा प्रकार घडवून आणला असे नागरिकांन कडून बोलल्या जात आहे…



