लोणवडी येथे ३० लक्ष रुपयेच्या भवन बांधकाम चे आ.राजेश एकडे यांचे हस्ते भुमीपुजन

नांदुरा – लोणवडी येथील नागरीकांनी सभामंडप तथा भवन निर्मीती ची मागणी मलकापूर विधानसभा मतदार संघाचे मा.श्री. राजेशभाऊ एकडे यांचेकडे केली होती आ.एकडे यांनी तात्काळ श्री विठ्ठल मंदिराजवळ भवन बांधकाम साठी 30 लक्ष रुपये चा भरीव निधी उपलब्ध करुन दिला. व या भवनाचे भुमीपुजन दि.७ एप्रील रोजी आ.राजेश एकडे यांचे हस्ते संपन्न झाले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ह.भ.प. श्री. प्रमोद महाराज राहणे उपस्थित होते तर प्रमुख उपस्थिती श्री. पद्मरावजी पाटील मा.मुख्य प्रशासक,कृ.उ.बा.स. नांदुरा श्री. भगवान धांडे तालुका अध्यक्ष, भा.रा.काँ.सौ. ज्योतीताई रविंद्र होनाळे तालुका अध्यक्षा, महीला काँग्रेस श्री. एकनाथ होनाळे अध्यक्ष, मारोती संस्थान, लोणवाडी श्री. वसंतराव भोजने जिल्हा प्रमुख, शिवसेना ठाकरे गट श्री. संजय चोपडे तालुका अध्यक्ष, रा.काँ.पा. सौ. निलीनीताई प्रल्हाद फासे सरपंच, ग्रा. पं. लोणवाडी श्री. पुरुषोत्तम ठाकरे उपाध्यक्ष, मारोती संस्थान, लोणवाडी श्री. ईश्वर पांडव तालुका प्रमुख, शिवसेना ठाकरे गट श्री. विजय सोळंके सदस्य, ग्रा. पं. लोणवाडी श्री. संजय होनाळे सचिव, मारोती संस्थान, लोणवाडी श्री.मोहनराव पाटील जि. उपाध्यक्ष, रा.काँ.पा. श्री. डॉ. प्रदिपजी हेलगे मा. विधानसभा अध्यक्ष, रा.काँ.पा.सौ. आशाताई गोंड काँग्रेस महीला नेत्या श्री. जनार्धन वानखडे सदस्य, ग्रा. पं. लोणवाडीश्री. राहुल मख ग्रामसेवक, ग्रा. पं. लोणवाडी यांची होती यावेळी मोठ्या संख्येने लोणवाडी येथील गांवकरी मंडळी उपस्थित होते सभामंडपा करीता भरघोस निधी उपलब्ध करुन दिल्या बद्दल श्री.मारोती संस्थान लोणवाडी रजि.नं. २५२ओ ग्राम पंचायत कार्यालय लोणवाडी यांनी आ.राजेश एकडे यांचे आभार मानले.




