बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शेगाव तहसीलदार सोनवणे यांच्या हेकेखोरीमुळे शेगाव महसूल कर्मचाऱ्या चा दहा महिन्याचा पगार रोखला

*शेगाव तहसीलदार सोनवणे यांच्या हेकेखोरीमुळे शेगाव महसूल कर्मचाऱ्या चा दहा महिन्याचा पगार रोखला*

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

शेगाव प्रतिनिधी श्याम पहूरकर

Sc समाजाच्या माणसावर तहसीलदार सोनवणे यांनी केला खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न**मुख्यमंत्री एकनाथ शिंदे च्या काळात शेगाव महसूल कर्मचाऱ्यावर तहसीलदाराकडून अन्याय*शेगाव महसूल कर्मचारी महसूल सहाय्यक रेणुकादास लक्ष्मणराव गायकवाड हे मूळ रहिवासी औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली येथील रहिवासी असून जातीने चांभार आहेत. ते सप्टेंबर 2009 मध्ये संग्रामपूर येथे शासन सेवेत रुजू झाले. गायकवाड यांनी शंकर मिरगे अव्वल कारकून तहसील संग्रामपूर व योगेश खारोडे गोदाम पालक संग्रामपूर हे त्रास देत असून या दोघांनी सन 2014 मध्ये गायकवाड यांच निलंबन घडवून आणलं.  निलंबन प्रकरणात गायकवाड यांनी जून 2022 मध्ये MAT न्यायालया अंतर्गत नागपूरला प्रकरण दाखल केले.        निलंबन प्रकरण हे तुम्ही मॅटमध्ये का दाखल केले म्हणून 21 मार्च 2022 मध्ये तहसील कार्यालय शेगाव च्या व्हाट्सअप ग्रुप वर आक्षेपार्ह मेसेज टाकले म्हणून सर्व शेगाव तहसील कर्मचाऱ्यां च्या सह्या घेऊन बनावट निवेदन महसूल कर्मचारी संघटना तहसील कार्यालय शेगाव यांनी सदर निवेदन तहसीलदार व जिल्हाधिकारी. व जिल्हा पोलीस अधीक्षक. व शहर पोलीस स्टेशन शेगाव यांना सादर केले. व आक्षेपा ह मेसेज ग्रुप वर टाकल्याबद्दल सप्टेंबर 2022 मध्ये शेगाव शहर पोलीस स्टेशन येथे गायकवाड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण सदर प्रकरण शेगाव शहर पोलीस स्टेशन ने हाताळले असता गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकला नाही.           एका कर्मचाऱ्यावर जर महसूल डिपार्टमेंटचे सर्व लोक मिळून खोटे गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केल्यामुळे गायकवाड हे सप्टेंबर2022 पासून अर्जित रजेवर आहेत. व त्यांना कुठल्याही प्रकारची नोटीस महसूल विभागाने न देता सप्टेंबर 2022 ते मे 2023 पर्यंत दहा महिन्याच्या पगारा पासून वेतनापासून वंचित ठेवण्यात आलेले आहेत.

    त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button