तेल्हारा शहरातील घरकुल लाभार्थ्यांची गुंठेवारीची समस्या मार्गी..

*तेल्हारा शहरातील घरकुल लाभार्थ्यांची गुंठेवारीची समस्या मार्गी..
*स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा तालुका प्रतिनिधी विजय घोडे
.तेल्हारा,शहरातील “प्रधानमंत्री आवास योजने” अंतर्गत येणाऱ्या असंख्य पात्र लाभार्थ्यांची गुंठेवारीची समस्या मार्गी लागली आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत येणाऱ्या असंख्य पात्र लाभार्थ्यांची गुंठेवारीची समस्या असल्यामुळे त्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागले होते,यामुळेच त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता, मात्र प्रधानमंत्री आवास योजना 2022 या कल्याणकारी योजनेचा सर्वांना लाभ घेता यावा या हेतूने प्रेरित होऊन मा.खा श्री संजय धोत्रे, भाजप प्रदेश सरचिटणीस रणवीर सावरकर, मा.आमदार श्री प्रकाशजी भारसाकळे, शहर भाजपा अध्यक्ष श्री महेंद्रजी गोयनका, यांच्या मार्गदर्शनाखाली तेल्हारा येथील प्रभाग क्रमांक 6 चे माजी नगरसेवक श्री सुनिलभाऊ राठोड तसेच भाजप पदाधिकारर्यांनी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री व संबंधित अधिकार्यांना वारंवार निवेदन देऊन तेल्हारा शहरातील घरकुल योजने बाबत प्रलंबित समस्या मार्गी लावली आहे.श्री सुनिलभाऊ राठोड, भाजप पदाधिकारी यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे, तसेच न.प. तेल्हारा चे मुख्याधिकारी श्री गावंडे सर यांनीही सक्षमपणे पुढाकार घेऊन हि समस्या शासन दरबारी वारंवार लावून धरली होती, ज्या वंचित लाभार्थ्यांची मालमत्ता ही गुंठेवारीची मालमत्ता आहे ,अशा मालमत्तेला नियमाकुल करने,तसेच त्या मालमत्तेची असेसमेंट मध्ये नोंद घेऊन लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ घेता यावा ह्या मुख्य बाबी शासन दरबारी मांडलेल्या निवेदनात नमूद करण्यात आल्या होत्या.



