तेल्हारा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आढावा बैठक संपन्न

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा ता.(प्रतिनिधी-व्ही.एम.घोडे)
तेल्हारा दि.19 आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संपर्क अध्यक्ष विठ्ठल लोखंडकार यांच्या आदेशाने अकोला जिल्हा अध्यक्ष राजेश भाऊ काळे यांच्या नेतृत्वात तेल्हारा शहरातील विश्रामगृह येथे ही आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून विविध समस्या जाणून घेतल्या व त्यामधल्या काही समस्यांचे निरासरण केले व नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
या आढावा बैठकीचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना तेल्हारा शहराचे शहराध्यक्ष श्याम भाऊ माहोरे यांनी केले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अकोला जिल्हाध्यक्ष राजेश भाऊ काळे यांनी बोलत असताना सांगितले की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्य व संस्थापक अध्यक्ष मा.राज साहेब ठाकरे यांचे विचार घरोघरी पोहोचवण्याची आज या ठिकाणी आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रतिज्ञा केली.या बैठकी ला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले महाराष्ट्र नवनिर्माण सहकारी सेनेचे राज्य उपाध्यक्ष संजय जी पळसकर ,अकोट-तेल्हारा उपजिल्हाध्यक्ष श्रीरंग दादा तट्टे, बाळापुर तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील कराळे ,यांच्या उपस्थितीत हि आढावा बैठक संपन्न झाली तसेच या बैठकीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तेल्हारा शहर अध्यक्ष श्याम भाऊ माहोरे, तेल्हारा तालुका उपाध्यक्ष नितीन आमझरे ,मा. तेल्हारा शहर अध्यक्ष मनीष गवळी ,मनसेचे तेल्हारा संघटक गोलू सोनटक्के ,तेल्हारा उपशहर अध्यक्ष दिलीप गावंडे ,मनसे तेल्हारा शहर चिटणीस सागर सूर्यवंशी ,तेल्हारा शहर सचिव अतुल पवार ,मनसे जनहित विधी विभाग उपजिल्हाध्यक्ष शशांक दादा कासवे ,हिवरखेड तालुका अध्यक्ष पवन नेरकर ,रोहित श्रीवास ,साहिल परदेशी ,अनिल गोल्हार ,गौरव रामेकर ,शंकर देशमुख ,रोहित उदमने ,शुभम पराडे ,ओम श्रीवास ,यांच्या समवेत विविध पदाधिकारी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीच्या शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष श्याम भाऊ माहोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले



