महाराष्ट्र

मुलींच्या सुरक्षेसाठी प्रत्येक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवा!

राम इढोळे शेतकरी पुञ यांची मागणी

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

वाशिम : – बदलापूर येथे घडलेल्या घटनेने माणुसकीला काळीमा फासला आहे. त्यामुळे विद्यमान शासनाच्या कार्यकाळात मुलींना शिक्षणासाठी शाळा देखील सुरक्षीत नसल्याचे अधोरेखीत होते. ही बाब पाहता शासन तथा प्रशासकीय विभागाने मुलींच्या शिक्षणासोबतच त्यांच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून प्रभावी उपाययोजना अंमलात आणावी, अशी मागणी राम इढोळे शेतकरी पुञ यांनी केली आहे.
गुरु-शिष्याचे नाते हे अतिशय पवित्र मानले जाते. मात्र, बदलापूर येथील घटनेने हे दाखवून दिले की, शाळेत शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी जाणाऱ्या मुली देखील सुरक्षीत नाहीत. तर दुसरीकडे राज्यशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. आदी बाबी पाहता आपल्या मुलींना शाळेत शिक्षणासाठी पाठवावे की नाही? असा प्रश्न पालकांसमोर उपस्थित होत आहे. त्यामुळे शासनाने तथा प्रशासनाने मुलींना शिक्षणाबरोबर त्यांच्या सुरक्षेसाठी देखील पावले उचलणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासह प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी राम इढोळे शेतकरी पुञ यांनी केली आहे.

चारीत्र्य पडताळणी सक्तीची करा
सरकारी नोकरीकरीता चारीत्र्य पडताळणी सक्तीची आहे. मात्र, खासगी शाळांमध्ये याची सक्ती नसते. परिणामी, गुन्हेगारी स्वरुपाची पार्श्वभूमी असलेले देखील अनेक खासगी शाळांमध्ये कामावर रुजू होतात. त्यातूनच मानुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडतात. त्यामुळे खासगी शाळांमध्ये कर्मचारी नेमणुकीपूर्वी चारीत्र्य पडताळणी सक्तीची करण्याची मागणी देखील राम इढोळे यांनी केली आहे.
….
अत्याचारानंतरच उपाययोजना करणार का?
शासन कुठल्याही प्रकरणात घटना घडल्यानंतरच पावले उचलते. याची उदहरणे म्हणजे ट्रॅव्हल्सला लागलेल्या आगी, हॉर्डींग्ज कोसळून झालेले मृत्यू, रस्ते अपघातात अशा कितीतही बाबी सांगता येतील. त्यामुळे एखाद्या चिमुकलीवर अत्याचार झाल्यानंतरच शासन तथा प्रशासन पावले उचलणार का? असा प्रश्न आता पालकांमधून उपस्थित केल्या जात आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button