बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

राष्ट्रीय हातमाग विणकर दिन उत्साहात साजरा

SBC संघर्ष समिती जिल्हा बुलढाणा अध्यक्ष श्री धर्मराजजी हनुमंते यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा, :श्री सुखानंद स्वामी मठ, देऊळगाव राजा येथे राष्ट्रीय हातमाग विणकर दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. SBC संघर्ष समिती जिल्हा बुलढाणा अध्यक्ष श्री धर्मराजजी हनुमंते यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री सुखानंद स्वामीजींच्या पावन समाधीस तसेच भगवान श्री जिव्हेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी हातमाग विणकर समाजाच्या योगदानाबाबत आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री घनश्याम भंडारे यांनी केले. यावेळी श्री शांतीलाल निरफळे, श्री रंगनाथ सपाटे, श्री गोविंदराव अहिरे, ह.भ.प. अनिल महाराज सपाटे आदी मान्यवरांनी हातमाग व्यवसायाचे ऐतिहासिक महत्त्व, विणकर समाजाचे कष्ट व कौशल्य तसेच समाजामध्ये पूर्वी हातमाग विणकरांना मिळणारा मानसन्मान याबाबत विचार व्यक्त केले.

हातमाग विणकरांच्या कष्ट, कौशल्य, हस्तकला आणि कारागिरीचा गौरव करताना राष्ट्रीय औद्योगिक विकासामध्ये तसेच पैठणी विणकामाच्या क्षेत्रात हातमाग विणकरांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विशेषतः येवला येथील पैठणी विणकामाची परंपरा आणि त्यामध्ये हातमाग विणकरांचे योगदान अधोरेखित करण्यात आले.

यावेळी पुढील वर्षी साळी, कोष्टी व सर्व विणकर समाज बांधवांनी एकजुटीने राष्ट्रीय हातमाग विणकर दिनाचा सोहळा अधिक मोठ्या प्रमाणावर आणि उत्साहात साजरा करण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमास श्री पांडुरंग नाना मैंद्रे, राधाकिसन अहिरे, गोविंदराव अहिरे, दत्तात्रय कोरडे, नंदकिशोर कोरडे, विनोद मैंद्रे, प्रकाश लाहोरे, कैलास भागवत, मधुकर धुळे, आण्णाभाऊ सपाटे, रंगनाथ सपाटे, अरुण सपाटे, घनश्याम भंडारे, गणेश रोडे, अनिल सपाटे, शरद निश्चल, वसंत लिपारे, जगदिश बरगे, सुशिल हनुमंते, दामुआण्णा पावले यांच्यासह मोठ्या संख्येने विणकर समाज बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन श्री प्रकाश अहिरे यांनी केले तर आभारप्रदर्शन श्री शरद निश्चल यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी हातमाग व्यवसायात योगदान देणाऱ्या ज्येष्ठ समाज बांधवांचा श्री धर्मराजजी हनुमंते यांच्या हस्ते शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

राष्ट्रीय हातमाग विणकर दिनाच्या निमित्ताने विणकर समाजाच्या परंपरा, कष्ट आणि कौशल्याचा गौरव करत समाजाच्या एकजुटीचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button