खानदेशजळगावा जिल्हा

मुंबईच्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे प्रलंबित काम पुर्ण करण्याची आ एकनाथराव खडसे यांची मागणी

मुक्ताईनगर -मुंबईच्या

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचे काम प्रलंबित असुन ते पूर्ण करण्यात यावे अशी मागणी आ एकनाथराव खडसे यांनी अतारांकित प्रश्नाद्वारे विधानपरिषदेत केली सदर प्रश्नाद्वारे त्यांनी शासनाला विचारणा केली की
मुंबईच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा होऊन आठ ते दहा वर्षे इतका कालावधी होऊनही अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नसुन
मा.पंतप्रधानांच्या हस्ते जलपुजन झालेले अरबी समुद्रातील शिवस्मारक गेल्या आठ वर्षापासून प्रलंबित असून दिनांक २४ डिसेंबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास शिवस्मारकाच्या जल पुजनाचा कार्यक्रम होऊन काम प्रलंबित असण्याची कारणे काय आहेत,
स्मारकाचे काम प्रलंबित असल्या कारणाने शिवप्रेमींमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने स्मारकाचे काम सुरु करुन तातडीने पूर्ण करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत असल्याची माहिती देण्यात यावी तसेच
स्मारकाचे काम पुर्ण करण्यात यावे अशी मागणी आ एकनाथराव खडसे यांनी केली
सदर प्रश्नाला ग्रामविकास मंत्री
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उत्तर देताना सांगितले
मुंबईच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा होऊन आठ ते दहा वर्षे इतका कालावधी होऊनही अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नसल्याची बाब खरी आहे
मुंबई अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे स्मारक उभारण्याबाबत बाब ही न्याय प्रविष्ट असून प्रकरणी मा. न्यायालयाच्या अंतिम आदेशास अनुसरून सदर प्रकल्पाबाबत पुढील योग्य ती कार्यवाही करण्याचे संकल्पित असल्याचे ग्रामविकास मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button