Uncategorized

खेळाच्या माध्यमातुन सर्वांगीन विकास साधता येतो .प्रा . वसंतराव अवचार

अमरावती विद्यापीठ ‘ड ‘ झोन वॉलीबॉल स्पर्धा झनक महाविद्यालयात संपन्न

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव : – खेळामुळे आपले आरोग्य तर चांगले राहतेच आपला मानसिक विकास सुद्धा साधला जातो . खेळामधुन सर्वधर्मसमभाव जोपासला जातो तसेच राष्ट्रप्रेमाची भावना देखील वाढीस लागते व सर्वांगीन विकास होतो . त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने एका तरी खेळामधे प्राविण्य मिळवावे . अशा प्रकारचे आवाहन प्रा वसंतराव अवचार यांनी मालेगाव येथील रामराव झनक महाविद्यालयात आयोजित अमरावती विद्यापीठाच्या मुलींच्या हॉलीबॉल स्पर्धेच्या समारोप प्रसंगी केले.
राष्ट्रसंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या शारीरिक विभागांतर्गत मालेगाव येथे ड झोन मुलींच्या हॉलीबॉल च्या स्पर्धा मालेगाव येथील रामराव झनक महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या . या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी प्रा . वसंतराव अवचार बोलत होते . त्या स्पर्धेचे बक्षीस वितरण प्राचार्य वसंतराव अवचार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर योगेश्वर निकस हे होते . प्रमुख उपस्थिती सिपना इंजिनियरिंग कॉलेज अमरावतीचे प्रा महेश लुंधाडे , गावंडे कॉलेज ऑफ फार्मसी साखरखेर्डाचे प्रा अमोल जाधव
, प्रा डॉ लता जावळे मॅडम यांची होती. तसेच पंच म्हणून किरणराव सरनाईक वाशिम, पोलीस कॉन्स्टेबल जितू पाटील, टीनू खान, मंगेश गायकवाड हे या स्पर्धेचे म्हणून उपस्थित होते. या स्पर्धेचे विजेतेपद सिपना कॉलेज ऑफ इंजीनियरिंग या संघाने पटकावले. तसेच उपविजेतेपद गावंडे कॉलेज ऑफ फार्मसी साखरखेर्डा या संघाने पटवत पटकावले .दोन्ही संघाच्या कॅप्टन व खेळाडुंना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शिल्ड व वृक्ष भेट देऊन गौरवण्यात आले . यावेळी बोलताना प्राचार्य डॉ . निकस म्हणाले की जिंकलेल्या खेळाडूंनी यापुढे अधिक सराव करून अमरावती विद्यापीठाचे विजेत विजेतेपद मिळवावे . आणि उपविजेत्या संघाने नाउमेद न होता अधिक सराव करून पुढच्या वर्षी विजेतेपदासाठी लढत द्यावी. असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ बाळासाहेब वाघ यांनी केले. तसेच सूत्रसंचालन प्रा डॉ भीमराव जांभरुणकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा डॉ .लता जावळे मॅडम यांनी केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button