विदर्भ

तेल्हारा खरेदी विक्री संस्थेची वार्षिक सर्वसाधारण आमसभा थाटात संपन्न!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

तेल्हारा दि.२७ सप्टेंबर २०२४ |
तेल्हारा तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था मर्यादित
तेल्हारा ची सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील वार्षिक सर्व साधारण सभा गुरुवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी भागवत मंगल कार्यालयात संस्थेचे उपाध्यक्ष राजेश्वर टोहरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेला प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे संचालक चंद्रकांत ताथोड, अनंत अहेरकर, शिवहरी काळे, पंढरीनाथ कोरडे, अरुण तेल्हारकर, शरद आखरे, पंकज आळे , विठ्ठलराव खारोडे, रमेश दारोकार राधेश्याम भदे, सौ अनिता ताई अरबट, सौ रत्नप्रभा ताई खारोडे, योगेश कुकडे यांची उपस्थिती होती संत गजानन महाराजांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करुन दिपप्रज्वलन व हारार्पन केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजेश्वर टोहरे यांनी अहवाल वाचन करून संस्थेच्या प्रगतीचा लेखा-जोखा उपस्थित भागधारकांसमोर मांडला यावेळी संस्थेच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली. संस्थेच्या २०२३-२४ चा वार्षिक अहवाल , ताळेबंद पत्रक, नफा तोटा पत्रक भागधारकांसमोर मंजुरी साठी सादर केला संस्थेच्या भाग भांडवलात वाढ झाली नसुन मागील भागभांडवल कायम आहे . संस्थेच्या अहवाल वर्षात व्यापारी नफा २ लाख ७६ हजार ८४४ रुपये झाला असून संस्थेची आर्थिक स्थिती चांगली आहे. संस्थेने शेतकऱ्यांसाठी खते , बि-बियाणे विक्री परवाना काढुन खत विक्री चालू केली आहे असे अहवाल वाचनात राजेश्वर टोहरे यांनी सांगितले सुत्र संचालन विलास वानखडे यांनी केले यावेळी भागधारक, सहकार क्षेत्रातील गणमान्य नेते कार्यकर्ते निमंत्रित नागरिक पत्रकार संस्थेचे व्यवस्थापक प्रविण पाथ्रीकर व कर्मचारी उपस्थित होते आभार प्रदर्शन रमेश दारोकार यांनी केले.
यावेळी तेल्हारा जिनींग अन्ड प्रेसीगची आमसभा संपन्न झाली संस्थेचे अध्यक्ष शेषराव पाथ्रीकर , उपाध्यक्ष शामसुंदर मंत्री , संचालक
राजेश खारोडे , डॉ विठ्ठलराव गेबड, राजकुमार खारोडे, प्रकाश कोरडे, निशांत ताथोड, शिवदास कुकडे, रामदास बिहाडे, विलास पाथ्रीकर, नागोराव फोकमारे , वंदना मार्के, शंकरराव बोदडे , गजानन मुंगसे, मुगुटराव अहेरकर आदी संचालक उपस्थित होते संस्थेचा अहवाल वाचन अध्यक्ष शेषराव पाथीकर यांनी केले डॉ विठ्ठलराव गेबड यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले संचालन माधवराव पाथ्रीकर यांनी केले यावेळी संस्थेचे व्यवस्थापक शंकरराव विखे सह संस्था भागधारक यावेळी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button