आंतरराष्ट्रीय

तिघांना प्रत्येकी ९० जागा कोणत्या जागांवर तिढा आणि कशासाठी?

घोळ संपेना : १८ जागा मित्र पक्षांना, मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा फेटाळली

मुंबई/नवी दिल्ली: महाविकास

आघाडीत सुरू असलेला वाद शुक्रवारीही शमला नाही. बुधवारी तीनही पक्षांना प्रत्येकी ८५ जागांच्या वाटपाची घोषणा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी राहिलेल्या जागांचा वाद संपेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ६ जागांवरील तिढा मागील तीन दिवसांपासून कायम आहे. एकीकडे हा घोळ सुरू असताना तिकडे दिल्लीत काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी मविआतील ९०-९०-९० चा नव्या फॉर्म्युल्याची घोषणा केली. तीन पक्ष मिळून २७० जागा लढवणार असून उरलेल्या १८ जागा लहान मित्र पक्षांना दिल्या जातील आणि त्यांचे समाधान केले जाईल, असे थोरात

यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. काँग्रेस, उद्धवसेना आणि शरद पवार गट या पक्षातील मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरूच आहेत. अशातच उद्धव सेनेने परस्पर उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाकरेंना पत्र लिहून नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, ज्या जागांवर मविआत वाद आहे तिथे मैत्रीपूर्ण लढत होणार अशी चर्चा होती. मात्र काँग्रेस नेते पटोले आणि थोरात यांनी ही चर्चा फेटाळली. आम्ही आघाडी म्हणूनच लढणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.

काही जागांची अदलाबदल होण्याचे संकेत

■ एकीकडे काँग्रेसचे नेते मातोश्रीवर जात असताना शुक्रवारी उद्धव सेनेचे नेते संजय राऊत यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे शरद पवारांची भेट घेतली.

■ या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना उद्धव सेनेते जाहीर केलेल्या उमेदवार यादीत थोडा बदल होऊ शकतो,

  • वर्सोवा, श्री साँवा, भायखका, रामटेक, परांडा आहे. वर्सोवा व भायखळ्याची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी गुरुवारी मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. ■ रामटेकबाबत काँग्रेसचा आग्रह कायम

नाना पटोलेंचे पत्र आणि ठाकरेंची नाराजी

१ मविआत ज्या जागांवर तिढा

कायम आहे अशा जागांवर उद्धव सेनेने परस्पर उमेदवार जाहीर करून एबी फॉर्मही दिल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त करणारे पत्र उद्धव ठाकरेंना लिहिले आहे. मात्र, पटोले यांच्या या पत्रामुळे उद्धव ठाकरे नाराज असल्याचे समजते.

नावात किंवा जागेत बदल होऊ शकतो असे सांगत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि आमच्यात एक-दोन जागांवर पुन्हा चर्चा होऊ शकतो, असे राऊत म्हणाले.

● त्यामुळे वादाच्या जागांबाबत चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर येणाऱ्या काँग्रेस नेत्यांना उद्धव यांच्या नाराजीचा सामना करावा लागत असल्याचे समजते. उद्धव ठाकरे हे काही जागा सोडायला आधी तयार झालेही होते, मात्र पटोले यांच्या या पत्रानंतर ते आता जागा न सोडण्यावर ठाम असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.

  • काही जागांची अदलाबदल होईल, काँग्रेस १०० च्या वर जागा लढवेल, असे विजय वड्डेटीवार यांनी सांगितले.

यांना आहे. उद्धवसेनेने तेथे विशाल बरबटे यांन माजी मंत्री राजेंद्र मुळीक यांना निवडणूक लढवायची आहे. त्यासाठी गुरुवार, शुक्रवार असे सलग दोन दिवस काँग्रेसचे विदर्भातील नेते सुनील केदार आणि मुळीक यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button