गुन्हेगारीमहाराष्ट्र

तालुका कृषी कार्यालयाच्या गोडाऊन मधुन सोयाबीन बियाण्याची चोरी १३८००० रुपयाचे बियाणे अज्ञात चोरटयांनी केले लंपासवा

तालुका कृषी कार्यालयाच्या गोडाऊन मधुन सोयाबीन बियाण्याची चोरी १३८००० रुपयाचे बियाणे अज्ञात चोरटयांनी केले लंपासवा

शिम जिल्हा प्रतिनिधी

अजय गायकवाड

मालेगाव -:

मेहकर रोडवर असलेल्या तालुका कृषी कार्यालयाच्या रोपवाटीके मध्ये असलेल्या गोडाऊन मधून 20 जून चे रात्री दरम्यान सोयाबीनच्या बियाण्याच्या एकूण 64 बॅगांची चोरी झाली असून तशा प्रकारची फिर्याद विशाल भीमराव भोकरे लिपिक तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांनी 21 जून रोजी मालेगाव पोलीस स्टेशनला दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार 20 जून रोजी सदर गोडाऊन वर असलेला चौकीदार नागसेन तानाजी खिल्लारे हा सुट्टीवर असल्यामुळे सदर गोडाऊनच्या कुलपाला फिर्यादीच्या सहीने शील लावून बंद करण्यात आले होते . गोडाऊनमध्ये सोयाबीनच्या के डी एस, 726 , 618 या वाणाच्या सुमारे 162 बॅगा ठेवल्या होत्या. त्या बॅगांपैकी 46 बॅगा वजन प्रत्येकी 30 किलो या कोणीतरी अज्ञात चोरट्याने 20 जूनच्या रात्री दरम्यान चोरून नेल्या . 21 जून रोजी ही घटना ते घटनास्थळावर गेल्यानंतर लक्षात आली असता त्या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण विठ्ठल सावंत यांना त्वरित माहिती दिली असता ते त्या ठिकाणी आले. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत सदर गोडाऊन ची तपासणी केली असता त्यामधील 64 बॅगांची चोरी झाल्याचे लक्षात आले . सदर बियाण्यांची किंमत एकूण एक लाख 38 हजार रुपये इतकी असून चोरीच्या घटनेची फिर्याद मालेगाव पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे . पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम 461 380 भादविनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल रवी साहेब सैबेवार हे करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button