तालुका काँग्रेस किसान सेलची मागणीअतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीची तपशिलवार माहिती द्याचिखली

चिखली प्रतिनिधी :आरुना दतात्रय खंडागळे
तालुका काँग्रेस किसान सेलची मागणीअतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीची तपशिलवार माहिती द्याचिखली :
तालुक्यातील अनेक गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणात पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी मोठया आर्थीक संकटात सापडले आहेत. शासनाकडुन शेतकऱ्यांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परंतू यात कोणत्या शेतकऱ्यांना मदत मिळाली व कोणत्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. तसेच, मदत मिळालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी व एकरी आधारावर किती रक्कम वितरीत करण्यात आली ? याबाबात पारदर्शकता नाही. तरी सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीची तपशिलवार माहिती द्यावी, अशी मागणी चिखली तालुका काँग्रेस किसान सेलच्या वतीने करण्यात आली आहे.सोमवार ८ डिसेंबर रोजी चिखली तालुका काँग्रेस किसान सेलच्या वतीने चिखली तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. निवदेनात नमूद आहे की, सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीची माहिती पारदर्शकपणे उपलब्ध करुन देणे, आवश्यक आहे. यामध्ये चिखली तालुकयातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची संपूर्ण यादी, मदत मिळालेल्या व अद्याप मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांची स्वतंत्र यादी, वितरीत केलेल्या मतदीचा हेक्टरी व एकरी तपशिल तालुका व गावनिहाय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.याप्रसंगी चिखली तालुका काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष समाधान आकाळ, तालुका काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष रामभाऊ भुसारी, तालुका काँग्रेस सहका सेलचे अध्यक्ष रामधन मोरे यांच्यासह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती



