
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : – येथील तालुका आरोग्य अधिकारी डाॕ.अश्विनी खासबागे यांनी आरोग्य क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याची सेवाभावी संस्थेने दखल घेतली असून गांधी जयंती दिनी मुंबई येथे आयोजित बनेगा स्वस्थ इंडिया या वार्षिक कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात येत आहे.
मालेगाव तालुका हा मोठ्या प्रमाणात दुर्गम आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी क्षेत्र आहे. आकांक्षीत वाशीम जिल्ह्यातील आकांक्षीत तालुका असलातरी एक आकांक्षीत तालुक्यातील नियोजित कामात अग्रेसर आहे. त्या सर्व भागात आरोग्याच्या सुविधा शेवटच्या घटका पर्यंत पोहोचविण्यासाठी डाॕ.खासबागे ग्रामीण आरोग्य केंद्र मालेगाव यांनी परिश्रम घेतले. त्यामध्ये विशेष करुन मालेगांव तालुका कुपोषण मुक्त करणे, टी.बी.मुक्त करणे, लसीकरण, ओपीडी वाढविणे, हॉस्पीटल मध्येच डिलेवरी करणे इत्यादी बाबत जनजागृती करुन कार्य केले आहे. तसेच वाशीम जिल्ह्यातील कुपोषण मुक्त कामात एक आदर्श असलेला तालुका म्हणून ओळखला जातो आहे.या सर्व कार्याची दखल मुंबईच्या सेवाभावी संस्थेने घेतली आहे. सदर कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्म उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे संचालन सिने अभिनेते आयुष्यमान खुराणा करणार आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी खासबागे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.



