मुक्ताईनगरराजकीय
— काँग्रेस ची मागणी जळगाव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना सरसकट पीक नुकसानीची मदत एकरी रु. ५००००द्या

सतत बरसणाऱ्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडला आहे त्यामुळे शासनाने जळगाव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट पीक नुकसानीची मदत एकरी पन्नास हजार रुपये द्यावी.
यावर्षी जुलै महिन्यापासून सतत मुसळधार व वादळीवार्यमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे . यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे कपाशी ,ज्वारी ,केळी, सोयाबीन ,मका व इतर पिके जमीन दोस्त झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावून नेला आहे.नुकताच मागील आठवड्यात अतिवृष्टीमुळे जमिनीचा कस वाहुन गेला.मका, ज्वारी, कापुस , सोयाबीन व ईतर पिकास कोंब फुटले.पिके वादळी पावसामुळे जमिनदोस्त झाली त्यामुळे शेतकरी राजा हवालदिल, हतबल,निराश झाला आहे आपणास विनंती की शासनामार्फत जळगाव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना सरसकट एकरी पन्नास हजार रुपयाची मदत त्वरित देण्यात यावी अशी मागणी मा.मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांचेकडे मुक्ताईनगर तहसीलदार साहेब यांचे मार्फत निवेदनाद्वारे केली आहे.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी VJNT विभागाचे प्रदेश सचिव अनिल वाडीले, संजय चौधरी पाटील प्रभारी अध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस इंटक उत्तर महाराष्ट्र विभाग,बी.डी.गवइ साहेब उपाध्यक्ष जळगाव जिल्हा काँग्रेस मागासवर्गीय सेल , शेख भैय्या शेख करीम अध्यक्ष अंतुर्ली शहर काँग्रेस,ज्योतीताई धामोळे महिला काँग्रेस अध्यक्ष मुक्ताईनगर,संजय धामोळे, प्रा.सुभाष पाटील अध्यक्ष सेवादल काँग्रेस, बाळासाहेब पाटील , शेतकरी बांधव, कार्यकर्ते उपस्थित होते.



