निवडणूकबुलढाणामहाराष्ट्रराजकीयविदर्भ
बुलढाणा जिल्ह्यात केवळ 20 हजार पदवी धारकांनी बजावला मतदानाचा हक्क..

बुलढाणा जिल्ह्यात केवळ 20 हजार पदवी धारकांनी बजावला मतदानाचा हक्क….
. (जी .डी . रोकडे जिल्हा प्रतिनिधी)
जिल्ह्यात केवळ 20 हजार 99 पदवी धारकांनी काल मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण पदवीधारकांचे जिल्ह्यात दोन लाखाच्या वर पदवीधर असताना इतक्या कमी संख्येने पदवीधारकांनी आपला मतदान हक्क बजावला आहे. बुलढाणा जिल्ह्यात 53.04 टक्के मतदान झाले आहे. ही टक्केवारी फारच कमी आहे. परंतु 2 फेब्रुवारी रोजी निकाला नंतर याचे उत्तर मिळणार असून अमरावती पदवीधर मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



