ॲड.मनोज राठी यांची तेल्हारा वकील संघाच्या अध्यक्षपदी तर सचिवपदी ॲड. संदीप वानखडे यांची निवड ! स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस अकोला जिल्हा प्रतिनिधी

तेल्हारा. दि.१६ सप्टें.| नुकत्याच झालेल्या तेल्हारा येथील वकील संघाच्या निवडणुकीमध्ये ॲड .मनोज राठी व सचिवपदावर ॲड.संदीप वानखडे यांचा प्रचंड मत मिळवून दणदणीत विजय झाला असून हल्ली त्यांचेवर संपूर्ण स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सोमवार दि.१५ सप्टेंबर २०२५ रोजी ही निवडणूक झाली असून तेल्हारा वकील संघाच्या अध्यक्षपदासाठी व सचिव पदासाठी हि निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीमध्ये अध्यक्ष पदाकरिता ॲड. मनोज राठी व ॲड. रामेश्वर मनतकार या दोन उमेदवारांमध्ये अत्यंत चुरशीची व अटी-तटीची लढत झाली. त्यामध्ये ॲड. मनोज राठी यांनी ३१ मते घेऊन दणदणीत विजय प्राप्त केला या प्रसंगी त्यांचे प्रतिद्वंधी ॲड. रामेश्वर मनतकार यांना २६ मतांवर समाधान मानावे लागले. तर सचिव पदाकरिता ॲड.संदीप वानखडे व ॲड. आकाश बुरघाटे यांच्यामध्ये थेट लढत झाली. त्यामध्ये ॲड.संदीप वानखडे यांचा काठावर म्हणजे त्यांच्या पारड्यात एक मत अधिकचे पडल्यामुळे त्यांचा विजय झाला आहे. सदरची निवडणूक अत्यंत खेळी-मेळीची झाली असून शांततामय वातावरणात निवडणूक पार पाडली. सदर निवडणूक मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्येष्ठ वकिल ॲड. श्रीकृष्ण रहाणे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. अख्तर शाह यांनी कामकाज पाहिले.
सदर निवडणूकी मध्ये विजयी उमेदवार यांच्या विजयात शिल्पकार वकील संघाचे ज्येष्ठ ॲड. नरेश चौधरी, ॲड. नेरकर, ॲड. कुलकर्णी, ॲड. मोहन अहेरकर, ॲड.मंगेश बोदडे ,ॲड .प्रकाश केसान ,ॲड .ज्योती राठी ,ॲड. डांगरा ,ॲड.प्रीती राठी ,ॲड.एन कुलकर्णी ,ॲड. मनोज ( पप्पू) राठी, ॲड. पवन शर्मा, ॲड. सागर शर्मा, ॲड. नासीर शेख, ॲड. नितीन पाटील, ॲड. संदीप देशमुख,ॲड गौतम वानखडे ॲड. मुन्ना रहाणे, ॲड. शिवदास सुशीर, ॲड. भूषण तायडे, ॲड. दानिश खान, ॲड.प्रकाश वाकोडे ,ॲड.राऊत ,ॲड .गावंडे ,ॲड.अतुल काकड, ॲड.अजय हागे ,ॲड भाकरे आदींचा समावेश आढळून आला.



