बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

तहसील कार्यालयाजवळील कब्रस्तानमधून ६० हजारांच्या शेळ्या-मेंढ्यांची चोरी; देऊळगाव राजा पोलिसांत अज्ञात चोरा विरोधात गुन्हा दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा:स्थानिक तहसील कार्यालयासमोरील कब्रस्तान परिसरातून अज्ञात चोरट्याने ६० हजार रुपये किमतीच्या ३ शेळ्या आणि २ लहान पिल्ले चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजा येथील अमृतनगर भागातील रहिवासी ६० वर्षीय महिला जाहेदाबी दिलदार शाहा या शेळीपालनाचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवतात. त्यांनी दिनांक ४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९:०० ते दुपारच्या १:०० वाजेच्या सुमारास त्यांच्या मालकीच्या ३ शेळ्या आणि २ लहान पिल्ले (अंदाजे किंमत ६०,००० रुपये) नेहमीप्रमाणे तहसील कार्यालयासमोर असलेल्या कब्रस्तान परिसरात चरण्यासाठी सोडल्या होत्या. दरम्यान, दबा धरून बसलेल्या अज्ञात चोरट्याने या शेळ्या व पिल्ले चोरून नेली.

आपल्या शेळ्या चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर जाहेदाबी शाहा यांनी परिसरात शोध घेतला, मात्र त्या मिळून आल्या नाहीत. अखेर त्यांनी आज, दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

फिर्यादीच्या रिपोर्टवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कायमी अप नं ४०७/२६, कलम ३०३ (२) बी.एन.एस. (भारतीय न्याय संहिता) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास अंमलदार महिला सहाय्यक फौजदार निलिमा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नारायण गिते करत आहेत. दिवसढवळ्या तहसील कार्यालयासारख्या शासकीय परिसराजवळून झालेल्या या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून चोराला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button