डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीदरम्यान श्री हरिओम महाराज यांचा भव्य सत्कार; हिंगणा गावामध्ये उत्साहाचे वातावरण….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
संग्रामपुर १७ एप्रिल २०२६
हिंगणा कवठळ ता. संग्रामपूर येथे १४ एप्रिल रोजी विश्वरत्न,भारतरत्न,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीला यंदा विशेष उत्साहाचे आणि सामाजिक एकात्मतेचे स्वरूप लाभले. गावभर जल्लोषात निघालेल्या या मिरवणुकी दरम्यान एक प्रेरणादायी आणि उल्लेखनीय प्रसंग घडला, ज्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये आनंद आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
गावातील हनुमान मंदिराजवळ सुरू असलेल्या भागवत सप्ताह मिरवणूक त्या ठिकाणी पोहोचताच नमो बुद्धाय मित्र मंडळ, हिंगणा कवठळ यांच्या वतीने भागवत कथाकार श्री हरिओम महाराज धानोरा यांचा पारंपरिक पद्धतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करून भव्य सत्कार करण्यात आला. या सन्मान सोहळ्या मुळे धार्मिक आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम पाहायला मिळाला.या सत्कार कार्यक्रमाचे नेतृत्व मंडळाचे अध्यक्ष श्री मुकिंदा गव्हांदे यांनी केले. त्यांच्या हस्ते महाराजांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या उपक्रमाचे स्वागत केले. मिरवणुकीतील सहभागी आणि सप्ताहासाठी उपस्थित भाविक या दोघांनीही या प्रसंगाचा आनंद घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे सदस्य आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या वेळी दिनेश उमाळे, दिनेश चोपडे, अनिल उमाळे, एकनाथ मोरखडे, प्रशांत बावस्कर, दीपक मोरखडे, वसंता मोरखडे, ज्ञानेश्वर मोरखडे, उमेश अढा ळे तसेच इतर कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या संपूर्ण उपक्रमामुळे हिंगणा कवठळ गावात सामाजिक सलोखा, एकोप्याची भावना आणि परस्पर सन्मान यांचा सुंदर संदेश दिला गेला. मिरवणूक आणि सत्कार सोहळ्यामुळे गावात आनंददायी वातावरण निर्माण झाले असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे….



