बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

प्रभाग क्र. 6 मध्ये SIR नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 800 नागरिकांचे अर्ज भरले

परिसरात घरोघरी जाऊन जनजागृती; मुख्याधिकारी अरुण मोकळ यांचे मार्गदर्शन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा: मतदार यादीतील नाव दुरुस्ती व नोंदणीसाठी सुरू असलेल्या S.I.R. ( Special Intensive Revision) नोंदणी अभियान अंतर्गत देऊळगाव राजा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये शनिवार व रविवारी विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून 800 नागरिकांनी नोंदणी अर्ज भरले.प्रभागातील मारुती मंदिर परिसरात शनिवारी दि.६/७/२६ तर गणपती मंदिर परिसरात रविवारी७/७/२६ रोजी हे अभियान राबविण्यात आले. यावेळी BLO म्हणून काम पाहणाऱ्या बोंबले सर व किरण तायडे सर यांनी 200 व 202 या दोन्ही बूथ मिळून एकूण 800 नागरिकांकडून SIR नोंदणी अर्ज यशस्वीरित्या भरून घेतले.
या अभियानाची माहिती घरोघरी पोहोचावी यासाठी नगरसेवक निशिकांत भावसार व नगरसेविका सौ. उषा दत्तात्रय गीते यांनी प्रत्यक्ष घरोघरी भेटी देऊन जनजागृती केली. त्यांच्या मोलाच्या परिश्रमामुळे अभियान यशस्वी झाले.
या नोंदणी अभियानाला भेट देऊन मार्गदर्शन व कौतुक करण्यासाठी डॉ. गणेश मांटे, नगराध्यक्ष सौ. माधुरीताई शिपणे यांनी प्रभाग क्रमांक 6 ला भेट दिली. तसेच या अभियानाला देऊळगाव राजा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरुण मोकळ साहेब यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
अभियानाला भा.ज.पा.महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. सविता पाटील व नगरसेविका सौ. अल्का धन्नावत यांनीही प्रमुख उपस्थिती दर्शवली. तर ज्येष्ठ पत्रकार विनायक कुलकर्णी यांनीही अभियानाच्या प्रसिद्धीसाठी मोलाचे परिश्रम घेतले.
या वेळी मा. शशिकांत खेडेकर साहेब यांनी देखील अभियानाला भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले.
आयोजकांनी माहिती दिली की, SIR नोंदणी अभियानानंतर लवकरच नवीन मतदार नोंदणी अभियान देखील राबविण्यात येणार आहे. यामध्ये 18 वर्षे पूर्ण केलेल्या नवीन तरुण-तरुणींची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी अशीच घरोघरी जाऊन जनजागृती केली जाईल.
या अभियानामुळे प्रभागातील मतदार यादी त्रुटीमुक्त होण्यास मदत होणार असून लोकशाही प्रक्रियेत अधिकाधिक नागरिकांचा सहभाग वाढणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button