खानदेशजळगावा जिल्हा

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाचेशस्त्रक्रिया अभियान रूग्णांसाठी पर्वणी

अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद ; ३३६ रूग्णांची नावनोंदणी

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

जळगाव – येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे शस्त्रक्रिया अभियान हे गरजू रूग्णांसाठी एक पर्वणीच ठरत आहे. या अभियानाला रूग्णांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत ३३६ रूग्णांची नाव नोंदणी झाल्याची माहिती रूग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रूग्णालयातर्फे दि. १८ ते २३ डिसेंबर या कालावधीत बिन टाका, चिरा आणि स्पेशालिटी व सुपरस्पेशालिटी शस्त्रक्रिया अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. अभियानाच्या दुसर्‍याच दिवशी जळगाव जिल्ह्यासह बुलडाणा, अमरावती, अकोला, वर्धा याठिकाणच्या रूग्णांनी नावनोंदणी करण्यासाठी गर्दी केली होती. अभियानासाठी ३३६ गरजू रूग्णांची नावनोंदणी करण्यात आली आहे.
६७ रूग्णांवर विविध शस्त्रक्रिया
अभियानाला सुरूवात झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात ६७ रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यात लेझरद्वारे मुळव्याध, भगंदर, व्हेरीकोज व्हेन्स, दुर्बिणीद्वारे अपेंडीसायटीस, गर्भपिशवीचे आजार, पित्ताशयातील खडे, ओवेरियन सिस्ट, कर्करोग शस्त्रक्रिया, मुत्ररोग शस्त्रक्रिया, मेंदू व मणका शस्त्रक्रिया, अस्थिरोग शस्त्रक्रिया, कान-नाक-घसा शस्त्रक्रिया, एन्जीओप्लास्टी, बायपास, पेसमेकर, बलुन शस्त्रक्रिया, व्हॉल्व्ह बदलविण्याच्या शस्त्रक्रिया गरजू रूग्णांवर करण्यात आल्या आहेत. पुढील चार दिवस नावनोंदणी सुरू राहणार असून ज्या रूग्णांना शस्त्रक्रिया आवश्यक आहे अशा रूग्णांना रूग्णालयात भरती करून घेतले जात आहे. शस्त्रक्रिया अभियानासाठी तज्ञ डॉक्टांची टीम आणि प्रशिक्षीत परिचारीका कार्यरत आहेत. तसेच शस्त्रक्रिया झाल्यानंतर रूग्णांची सुटी होईपर्यंत देखभाल करण्यासाठी नर्सिंग स्टाफही उपलब्ध करून देण्यात आला आहे.
कोट…
अभियानात दिलेल्या शस्त्रक्रियांसाठी मोठा खर्च लागतो. मात्र गरजू रूग्णांना हा खर्च पेलविणारा नसल्याने सामाजिक जबाबदारी म्हणून डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातर्फे हे अभियान राबविले जात आहे. रूग्णांचा या अभियानाला मिळत असलेला प्रतिसाद ही समाधानाची बाब आहे. जळगावसह विदर्भातील अधिकाधिक रूग्णांनी वेळ न दवडता या अभियानाचा लाभ घ्यावा.

  • डॉ. वैभव फरके, शल्यचिकीत्सक.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button