जळगावा जिल्हामुक्ताईनगर

अवैध दारूविक्रीवर मुक्ताईनगर पोलिसांची धडक कारवाई; ४० लिटर दारू जप्त

मुक्ताईनगर | प्रतिनिधी

मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारूविक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी तत्काळ व प्रभावी कारवाई करत आरोपीस ताब्यात घेऊन मोठ्या प्रमाणात दारू जप्त केली आहे. ही कारवाई दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३.४५ वाजता हरताळे गावातील बसस्टँड चौकाजवळ, आर्दश हॉटेलच्या मागील बाजूस करण्यात आली.

मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक /2025 नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी डिंबर कुंडू घोपे (वय ४६, रा. हरताळे, ता. मुक्ताईनगर) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे २ प्लास्टिक कॅनमध्ये प्रत्येकी २० लिटर प्रमाणे एकूण ४० लिटर हातभट्टीची तयार दारू आढळून आली. सदर दारूची अंदाजे किंमत ४,००० रुपये असून ती विक्रीच्या उद्देशाने बाळगण्यात येत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

फिर्यादीच्या तक्रारीवरून पंचनामा करून दारू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाची गुन्हा नोंद ठाणे अंमलदार महेंद्र शांताराम सुरवाडे यांनी केली असून, मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार पुढील तपास सुरू आहे.

अवैध दारूविक्रीसारख्या सामाजिकदृष्ट्या घातक प्रकारांवर अंकुश ठेवण्यासाठी मुक्ताईनगर पोलिसांकडून सातत्याने कडक कारवाई करण्यात येत असून, पोलिस कर्मचाऱ्यांच्या या तत्पर व जबाबदार कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button