खानदेशजळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

आदिवासी वर्गाला शहराकडे येण्याचा महत्त्वाचा मार्ग,बऱ्याच कालावधीपासून नागरिक त्रस्त!त्वरित नवीन रस्ता व्हावा या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलनाची घोषणा!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी-

हिवरखेड दि.२० :-
तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड- चिचारी-चंदनपुर रेल्वे स्टेशन या रस्त्याची अनेक वर्षांपासून प्रचंड दुर्गती झालेली आहे. हा रस्ता म्हणायलाच डांबरी रस्ता! अनेक वर्षांपूर्वी ज्यावेळी या रस्त्याचे डांबरी करणाचे काम झाले होते ते अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले होते. एकीकडे रस्ता बनने सुरू असतानांच तात्काळ दुसरीकडे रस्ता उखडणे सुरू झालेले होते रस्त्याच्या बाबतीत अशा प्रकारची स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा आहे यावरूनच या रस्त्याच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार संबंधित अधिकारी लोकप्रतिनिधी ठेकेदार व संबंधितांनी त्यावेळी केला असावा असे रस्त्याच्या दुर्दशेवरून दिसते.
या मार्गावर दररोज हजारो प्रवाशी, शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, शेतकरी बंधू, आदिवासी बांधव, ये जा करतात.
मेळघाटातील आदिवासी बांधव तसेच रुग्णांना शहराकडे येण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे.
हा रस्ता पूर्णपणे खराब झाला असून या मार्गावर धावणारी शेकडो वाहने भंगार झाली आहेत. अनेकांना मणके व हाडांचे त्रास झाले आहेत. या रस्त्यावर भाड्याची वाहने नेण्यासाठी वाहन चालक लवकर तयार होत नाहीत. त्यामुळे शेतमाल बाजारपेठेत पोहोचविणे सुद्धा शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. या मार्गाकडे कोणतेही लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी लक्ष देत नसून या रस्त्याकडे यांचे लक्ष वेधल्या जावे म्हणूनच या रस्त्याचे नवीन बांधकाम करण्याच्या मागणीसाठी येत्या काही दिवसात शेतकरी, प्रवाशी, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, रास्ता रोको आंदोलन छेडणार आहेत. याबाबत यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार सुद्धा केला आहे, परंतु अजून कोणतीही ठोस पाऊल उचलले गेले नाही. त्यामुळे प्रवाशांना रास्ता रोको आंदोलन करण्याची वेळ आल्याचे दिसून येत आहे. हा रस्ता तात्काळ व्हावा अशी मागणी जोर धरत आहे.
परिसरातील सर्व गावांची जनता ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद आमदार, खासदार इत्यादी अनेक पदासाठी राजकीय नेत्यांना विश्वासाने मतदान करते परंतु निवडून आल्यानंतर यापैकी कोणीही या रस्त्यासाठी आतापर्यंत निधी मंजूर करून आणला नाही. फक्त पोकळ आश्वासने देऊन जनतेची बोळवण सुरू असल्याने आश्वासनांचे चॉकलेट घेऊन त्रस्त झालेल्या जनतेने शासनाचे व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी नाईलाजास्तव रास्ता रोको आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे संबंधित लोकप्रतिनिधींनी व अधिकाऱ्यांनी वेळीच आपले कर्तव्य ओळखून या रस्त्यासाठी निधी मंजूर करून काम सुरू करावे अन्यथा या रस्त्याच्या मागणीचा विषय पेटणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत.

प्रतिक्रिया:-
हिवरखेड ,चिचारी रस्त्याचे काम कोणत्याच लोकप्रतिनिधींकडून अथवा कोणत्याही योजनेच्या निधीतून मंजूर झालेले नाही. व या रस्त्यासाठी आम्ही शासनाकडे कोणतीही निधीची मागणी सुद्धा केलेली नाही. त्यामुळे रस्त्याचे काम सुरू होनार नाही. या रस्त्याची मी अद्याप पाहणी सुद्धा केली नाही.
एम. एच. पुनसे, उपविभागीय अभियंता, सा.बां. विभाग जिल्हा परिषद अकोला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button