यशोधाम पब्लिक स्कूल मध्ये गजर महाराष्ट्राचा सोहळा संपन्न

मलकापूर प्रतिनिधी : विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव मिळून महाराष्ट्र राज्याची संस्कृतीची जोपासना व्हावी अशा उदात्त हेतूने यशोधाम पब्लिक स्कूल येथे गजर महाराष्ट्राचा या विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे आयोजन दिनांक 18 व 19 डिसेंबर रोजी करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच सामाजिक दायित्वाची जाणीव असावी अशा उदात्त हेतूने डॉ. वैभव महाजन यांच्या संकल्पनेतून यशोधाम पब्लिक स्कूल मध्ये विविध समाज उपयोगी उपक्रम राबविल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलनाचे औचित्य साधत दिनांक 18 व 19 डिसेंबर रोजी महाराष्ट्र संस्कृतीचे जतन होण्याकरिता गजर महाराष्ट्राचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी शाळेचे संचालक डॉ वैभव महाजन, अनंता बाई चवरे, डॉ. आशा महाजन, गटशिक्षणाधिकारी एन जे फाळके, शिक्षण विस्तार अधिकारी एन बी शिंदे, जिल्हा क्रीडा सचिव विजय पळसकर, तालुका क्रीडा अधिकारी दिनेश राठोड, असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट अधिकारी नागनाथ महाजन, बेलाड केंद्रप्रमुख अनिल खर्च, प्राचार्य उषा मॅडम, वरिष्ठ पत्रकार हनुमान जगताप, वीरसिंह राजपूत, नितीन भुजबळ, धीरज वैष्णव यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा व ऐतिहासिक ठेवा विद्यार्थ्यांच्या समोर जिवंतपणे साजरा करण्याच्या संकल्पनेतून आयोजन करण्यात आलेल्या गजर महाराष्ट्राचा सोहळा वाय. पी. एस. चा या कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या गडकिल्ल्यांचे प्रतिकृती आकर्षक असे रंगमंच उभारण्यात आले होते. या रंगमंचावर विद्यार्थ्यांकडून लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये पोवाडे, भारुड, गोंधळ, लावणी, असे विविध महाराष्ट्रीयन कलाप्रकार सादर करण्यात आले. त्याचबरोबर एकता दर्शविताना गरभा, भांगडा, कव्वाली यांसोबतच शिवरायांची शौर्यगाथा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संघर्ष, लोकमान्य टिळकांचे कार्य, सावित्रीबाई फुलेंचा संघर्ष, संत गोरा कुंभाराची भक्ती अशा अनेक महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जडलेल्या घटनाक्रमांच्या देखावा सादर करण्यात आला होता.
सोहळ्याच्या यशस्वी ते करिता यशोधाम पब्लिक स्कूल येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी रुंद यांनी अथक परिश्रम घेतले.
चौकट.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बरोबरच क्रीडा कला आणि महाराष्ट्राचे संत महात्मा तसेच देशभक्ती या गोष्टी विद्यार्थ्यांचे मनात रुजवण्याचे कार्य शाळेच्या माध्यमातून होत आहे. आयोजित सोहळ्याचे नियोजन अतिशय शिस्तबद्ध होते. आपण विद्यार्थ्यांप्रती जागृत आहातच मात्र आपल्याबरोबरच पालकांनी वाहतूक नियमा संदर्भात सुद्धा जागरूक असणे आवश्यक आहे.



