खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रशैक्षणिक

ज्ञानदा प्रकाशनचा दिमाखदार १६ वा वर्धापनदिन सोहळा व छत्रपती प्रतिष्ठानचा शिवजयंती उत्सव उत्साहात संपन्न!

ज्ञानदा प्रकाशनचा दिमाखदार १६ वा वर्धापनदिन सोहळा व छत्रपती प्रतिष्ठानचा शिवजयंती उत्सव उत्साहात संपन्न!

साहित्यकृतींचे प्रकाशन व विविध क्षेत्रांत उल्लेखनिय कार्य करणाऱ्यांचा गौरव

      ग्रामीण भागातील लेखकांच्या व साहित्यीकांच्या साहित्याला हक्काचे विचारपीठ मिळण्याच्या उद्देशाने *वाड्यासारख्या ग्रामीण भागामध्ये १६ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या ज्ञानदा प्रकाशन या संस्थेने व त्या माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या ज्ञानार्जन या साप्ताहिकाने दि. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या दिवशी यशस्वीरित्या १६ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने ज्ञानदा प्रकाशन व ज्ञानार्जन साप्ताहिकाचा १६ वा वर्धापनदिन तसेच छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती सोहळ्याचे आयोजन वाडा येथे पां.जा.हायस्कुलच्या मैदानावर करण्यात आले होते.*
    यावेळी झालेल्या कार्यक्रमप्रसंगी *ज्ञानार्जन साप्ताहिकाच्या अंकाचे तसेच ज्ञानदा प्रकाशनने प्रकाशित केलेल्या कसारा, ता. शहापूर येथील दामू धादवड यांनी लिहिलेल्या अनुभव निसर्गातील व निसर्गातील नवलकथा या दोन पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.*
    याबरोबरच छत्रपती प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने दरवर्षी ठाणे आणि पालघर जिल्ह्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जातो. यावर्षीही या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. 

यामध्ये प्रशासकीय कामामध्ये वाडा पोलीस ठाण्याला पालघर जिल्ह्यात प्रथम व कोंकण विभागात पाचवा क्रमांक मिळाल्याबद्दल वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक दशरथ पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच ग्रामीण भागात उत्कृष्ट पत्रकारिता करणारे पालघर येथील दै. पुढारी व सामनाचे प्रतिनिधी सचिन जगताप यांना स्व. राम बा. पाटील स्मृती आदर्श पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याबरोबरच कृतीशील पत्रकार म्हणून टीव्ही 9 चे प्रतिनिधी शशिकांत कासार (वाडा) यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच आदर्श शेतकरी म्हणून अजय राऊत (केळठण), महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार नवनाथ अनंता शिंदे (जि.प.शाळा, वाघोटे – प्राथमिक), रमेश यल्लप्पा पवार (शारदा विद्यालय नेहरोली – माध्यमिक), सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार सौ. हर्षला हरेश पाटील (जि.प.शाळा उज्जैनी – प्राथमिक), सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्याबद्दल कमळाकर पाटील (वाडा), कु. पौर्णिमा पवार (सजन, ता. विक्रमगड ) तर शिल्पकला क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणारा आशिष साळवी (वाडा) यांना पुरस्कार प्रदान करुन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आल्याची माहिती संपादक व संस्थेचे अध्यक्ष युवराज ठाकरे यांनी दिली.
या भव्य सोहळ्यासाठी कॉंग्रेस (आय) चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मनिष गणोरे, कॉंग्रेस (आय) चे पालघर जिल्हा अध्यक्ष प्रफुल (काका) पाटील, शिवसेना पालघर जिल्हा सहसंपर्क प्रमुख व जि. प. पालघर चे माजी उपाध्यक्ष निलेश गंधे, भाजपाचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष संदीप पवार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनिल पाटील, मशालचे संपादक शरद पाटील, टीडीसीसी बॅंकेचे संचालक निलेश भोईर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रकाश भांगरथ, कुणबी सेना पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश पाटील संभाजी ब्रिगेडचे पालघर जिल्हाध्यक्ष तेजस भोईर, भाजपा महिला आघाडी पालघर जिल्हा उपाध्यक्ष शुभांगी उत्तेकर, वाडा पोलीस निरिक्षक दशरथ पाटील, वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा गितांजली कोलेकर, उपनगराध्यक्ष संदिप गणोरे, पालघर जि. प. सदस्या भक्तीताई वलटे, पंचायत समिती उपसभापती जगदीश पाटील, पंचायत समिती सदस्य अमोल पाटील, शिवसेना उपतालुका प्रमुख तुषार यादव, सचिव निलेश पाटील, भाजपा वाडा तालुका सरचिटणीस रोहन पाटील, शिवसेना माजी तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, वाडा नगरपंचायतीच्या महिला बालकल्याण सभापती वर्षा गोळे, नगरसेवक वैभव भोपतराव, राम जाधव, भारती सपाटे, विशाखा पाटील, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे कोकण विभाग कार्याध्यक्ष रविंद्र पालवे, राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुका अध्यक्ष गणेश पाटील, भाजपा युवा मोर्चा पालघर जिल्हा सरचिटणीस कुणाल साळवी, सामाजिक कार्यकर्ते प्रविण ठाकरे, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद घोलप, राष्ट्रवादी वाडा शहर अध्यक्ष अमिन सेंदू, कॉंग्रेस (आय) शहर अध्यक्ष सुशिल पातकर, पत्रकार रमेश पाटील, वैभव पालवे, शशिकांत कासार, संजय लांडगे, सिद्धार्थ सांबरे, रुपेश मोकाशी, चर्मोद्योग कामगार सेनेचे भरत गायकवाड, जिजाऊ संघटना महिला आघाडी प्रमुख किर्ती भोईर, पां.जा.हायस्कुलचे मुख्याध्यापक बी. के. पाटील, सामाजिक कार्यकर्ते संदिप दुपारे, राजू वाडिया, दिपेन मोकाशी, रंजन पाटील, सचिन पष्टे, आबा साळुंखे, मंदाताई कांबळे, नंदाताई बोरकर, मनिषाताई भालेराव, गवंडी मजूर संघटनेचे अध्यक्ष भिमराव बागुल, वंचित बहुजन आघाडीचे पालघर जिल्हा युवा अध्यक्ष अतिष जाधव, कुणबी नागरी पतसंस्थेचे संचालक संचालक नाशिकराव पाटील, उल्हास पाटील, प्रल्हाद सावंत, हेमंत सांबरे, दिक्षिता पाटील, गणेश मोहिते, निहेश गायकवाड, प्रफुल्ल पाटील, अजित ठाकरे, इ. मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिवजयंती निमित्त जागर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक छत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ऋषिकेश सावंत यांनी केले. सूत्रसंचालन अनिल पटारे यांनी केले. तर आभार संस्थेचे अध्यक्ष युवराज ठाकरे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानदा प्रकाशन, ज्ञानार्जन व छत्रपती प्रतिष्ठान, वाडा कुणबी नागरी पतसंस्था, साईराज व साईदेवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button