खाटू श्याम बाबा फागण उत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

खाटू श्याम बाबा फागण उत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहूरकरशेगाव सलग बारा वर्षापासून खाटू श्याम बाबा फागण उत्सव चा दिव्य प्रवासशेगाव शहरात खाटू श्याम परिवारातर्फे दरवर्षी खाटूश्याम बाबा फागण उत्सव चे आयोजन दरवर्षी मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येत असते यावर्षी सुद्धा दिनांक 3 मार्च रोजी भव्य निशान यात्रा व भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेशेगाव शहरात मागील बारा वर्षापासून राजस्थानी समाजातर्फे खाटू श्याम बाबा जे राजस्थान मधील जागृत देवस्थान मानल्या जाते त्यामुळे या फागुन उत्सवाकरिता मोठ्या प्रमाणावर राजस्थानी समाज लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी दरवर्षी दर्शनाला जात असतात परंतु राजस्थानी समाज हा महाराष्ट्रभर विखुरलेला असल्याने ठिकठिकाणी खाटू श्याम बाबा मंदिर बांधण्यात आलेले आहे तर प्रत्येक ठिकाणी खाटू श्याम परिवार तर्फे फागण उत्सव चे आयोजन फार भव्य प्रमाणात करण्यात येत असते ज्यामध्ये भव्य निशान यात्रा आणि भजन संध्या ज्यामध्ये श्याम बाबा चे भजन आपल्या सुमधुर वाणी मधून गाणारे कलाकार बोलविण्यात येत असतात शेगावला यावर्षी तीन मार्चला सकाळी नऊ वाजता श्री बडा बालाजी मंदिर ते अग्रसेन भवन मध्ये उभारण्यात आलेल्या श्याम धाम पर्यंत भव्य निशान यात्रा चे आयोजन करण्यात आले आहे तर संध्याकाळी खाटू श्याम परिवारातर्फे भजन संध्या कार्यक्रमानिमित्त कृतिका मालविया इटारसी आणि अर्चना पुरोहित कामठी यांच्या सुमधुर वाणी मधून श्याम बाबा चे भजन स्थानिक अग्रसेन भवन मध्ये आयोजित केलेले आहे आता शेगाव शहरात खाटू श्याम बाबा फागण उत्सव हा केवळ राजस्थानी समाजातर्फे आयोजित तर केल्या जातो परंतु खाटू श्याम बाबाच्या आशीर्वादाने अनेकांच्या मनोकामना पूर्ण होत असल्याने आता हा उत्सव सर्व धर्मीय साजरा करण्यात येणारा उत्सव म्हणून पाहण्यात येतो याकरता या भजन संध्या ला खाटू श्याम बाबा फागण उत्सव मध्ये खाटू श्याम प्रेमी भक्तांनी उपस्थित होऊन भजन व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन खाटू श्याम परिवारातर्फे करण्यात आले आहे



