जि. प. मराठी प्राथमिक शाळा हिंगणा येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
हिंगणा:- १५ ऑगस्ट २०२६
जि. प. मराठी प्राथमिक शाळा हिंगणा येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सौ. वर्षा सतीश मोरखडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर आयोजित कार्यक्रमात महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर आधारित संगीतमय कवायत मोठ्या उत्साहात सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी मध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थिनी कु. परी प्रवीण बावस्कार व विद्यार्थी मधूर मोहन देठे यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील संघर्ष, स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान व देशभक्तीची भावना विद्यार्थ्यांच्या मनोगतातून प्रभावीपणे व्यक्त झाली. संस्कार मोरखडे, स्वरा इंगळे, परी बावस्कार व मधूर देठे या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यलढ्याविषयी आपले मनोगत इंग्रजी हिंदी व मराठी भाषेतून व्यक्त केले. नशा मुक्ती अभियानांतर्गत मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा संदेश वाचून दाखवण्यात आला व नशा मुक्ती प्रतिज्ञा घेण्यात आली. या उत्साहपूर्ण कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. वर्षा मोरखडे, सदस्य सौ. पद्मा अढाळे, सौ. संगीता मोरखडे, सौ. बबिता उमाळे, श्री. प्रवीण बावस्कार तसेच पत्रकार श्री. मुकिंदा गव्हांदे, श्री. श्रीपत मोरखडे, श्री. लीलाधर कांडेलकर, श्री. योगेश उमाळे, निखिल मोरखडे, शुभम मोरखडे, रमेश अढाळे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. भास्कर डोसे सर व शिक्षक श्री. पिराजी सूर्यवंशी सर यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. देशभक्ती, उत्साह आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी रंगलेल्या वातावरणात स्वातंत्र्य दिनाचा सोहळा आनंदात व उत्साहात संपन्न झाला.











