Uncategorized

ग्राम कोठा घरकुल अनुदानतील रखडलेली रक्कम त्वरित जमा करा.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव :- पंचायत समिती गटविकास अधिकारी व सभापती यांना एका निवेदनाद्वारे वैभव अवचार (सदस्य ग्रामपंचायत ) यांनी.
बापूनगर,कोठा खंडाळा सर्कल मधील व ग्राम कोठा येथील घरकुल अनुदानतील रखड लेल्या रक्कम लाभार्थीचा खातात त्वरित जमा करा अशी मागणी केली आहे.
पंतप्रधान घरकुल योजना मोदी आवास योजना शबरी घरकुल योजना या योजने अंतर्गत घरकुला साठी पात्र असलेल्या सर्व लाभार्थचे राखडलेले अनुदान त्याचा खात्यामध्ये त्वरित जमा करावे मागील अनेक दिवसानं पासून खंडाळा सर्कल मधील व ग्राम बापुनगर कोठा येथील गावाकऱ्यांनी ग्रामपंचायत व पंचायत समिती कडे मागतिलेले सर्व कागदपत्रे दिले असूनही काही जणांना आता प्रयत्न घरकुलचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे. घरकुल योजने करिता टार्गेट कमी असल्यामुळे मुळे लाभार्थी त्याचा पासून वंचित आहेत तरी टार्गेट वाढून त्या मध्ये जास्तीजास्त लाभार्थी लोकांचा त्यामध्ये समावेश करून घ्यावा व काही गावा मध्ये खऱ्या लाभार्थी डावलून खोट्या लोकांना लाभ मिळत आहे अशा लोकांनावर कडक कारवाई करण्यात यावी मागण्या मान्य न झाल्यास पंचायत समिती मालेगाव समोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनातून पंचायत समिती मालेगाव येथे दीला आहे . यावेळी कक्षाधिकारी यादवराव पळसकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी पंचायत समिती सभापती मधुकर काळे प सं सदस्य बाळू वाघ भागवनराव शिंदे उद्धव गोडे नितीन वाघ व आदी मंडळी उपस्थित होती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button