जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ढोरपगांव आणि ग्रामपंचायत कार्यालय ढोरपगांव येथे स्वतंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी: गजानन तांगडे खामगांव
खामगाव तालुक्यातील ढोरपगांव येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच सौ वनमालाताई संदीप मुंडे यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद मुंडे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रगीत झाले
स्वातंत्र्य दिन निमित्त सकाळी ठीक आठ वाजता ध्वजारोहण करण्यात आले शाळा परिसरात मान्सूनच्या वातावरणात उत्साह राष्ट्रध्वज वंदन झाले. अमली पदार्थ सेवन न करण्याची आणि आपल्या परिसरातून आपली पदार्थ दूर ठेवण्याची शपथ घेण्यात आली.
या स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेत विद्यार्थ्यांनी रांगोळ्या काढत हर्ष नोंदविला विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे आणि नृत्याचे सुंदर कार्यक्रम सादर केले. सांस्कृतिक कार्यक्रम देशभक्तीवर आधारित समूहगान एकांकिका आणि प्रेरणादायी भाषणे मुलांनी सादर केले मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना शिस्त,अभ्यास आणि देशाच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले.
शाळा समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रम झाल्यानंतर शेवटी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना खाऊचे वाटप करण्यात आले. या स्वातंत्र्य दिनाच्या माणसाला सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,शाळा समिती सदस्य, ग्रामसेवक,तलाठी माजी विद्यार्थी आणि मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षिका अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस विद्यार्थी विद्यार्थ्यांनी ग्रामस्थ उपस्थित होते












