कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या मृतक पं.स.चे माजी उपसभापती स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर शेगाव सततची नापिकीमुळे वाढत असलेले कर्ज तसेच तीन मुलीचे शिक्षण व विवाह कसे करायचे यामुळे वैफल्यग्रस्त होऊन ४९ वर्षीय शेतकरी तथा पंचायत समितीचे माजी उपसभापती असलेले पुंडलिक पारस्कर यांनी शेतात निंबाचे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील पहुरजिरा येथे २३ मार्च रोजी दुपारी उघडकीस आली.शेगावपुंडलिक दत्तू पारस्कर चय ४९ यांच्याकडे एक ते दीड एकर शेती आहे. तसेच कुटुंबात त्यांची पत्नी, ३ मुली व वयोवृद्ध आई असे सर्व सदस्य त्यांचेवर अवलंबून आहेत. परिस्थिती हलाखीची असल्याने तसेच त्यांनी घेतलेले विदर्भ कोकण ग्रामीण बैंक शाखा पहरजीरा या बँकेचे कर्ज चकीत होते. यावर्षी त्यांना केवळ एक पोते सोयाबीन व५० किलो तूर असे पीक झाले. त्यामुळे बँक व अन्य कर्ज ते परतफेड करू नाहीत. त्यामुळे शकले नाहीत. आर्थिक विवंचनेतून त्यांनी शेता मधील निंबाचे झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. ते सन २००७ मध्ये पंचायत समिती शेगाव येथे होते. याप्रकरणीउपसभापतीत्यांचा भाऊ चेतन दत्तू पारस्कर वय ४८ वर्ष रा. पहूरजिरा यांनी पो स्टे जलंब येथे दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कलम १७४ जा.फौ. नुसार नोंद केली आहे.पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्रेताचा पंचनामा केला असता मृतक पुंडलिक पारसकर यांचे खिशात आत्महत्या करण्याचे कारण नमूद केलेली तसेच कर्जाबाबत मजकूर लिहिलेली चिठ्ठी आढळून आली असल्याची माहिती जलंब पोस्टेचे ठाणेदार अमोल बारापात्रे व मृतकचे चुलतभाऊ श्रीकृष्ण पारसकार यांचेकडून मिळाली. घटनेचा तपास पोहेकॉ मो. शफीक करत आहेत.



