जिल्हाधिकारी यांचा लाखपुरी सर्कलमधील अतिवृष्टीग्रस्त गावाचा व शेतीचा पाहणी दौरा.

जिल्हा अधिकारी अजित कुंभार यांचे शासनस्तरावर मदतीसाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे नुकसानग्रस्तांना आश्वासन ! स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस अकोला जिल्हा प्रतिनिधी
मुर्तिजापूर |
दि. १६ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या ढगफुटीमुळे मुर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी सर्कलमधील रसलपूर व लाखपूरी व आसपासच्या परिसरातील कापूस, तूर, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची घरेही पडझड झाली. नदी काठ व नाल्याकाठाच्या आसपासच्या व सखलभागातील जमिनीवर पाणी साचल्याने अनेक शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन, तूर पिकाची नासाडी झाली असल्याची माहिती प्राप्त झाली असून आसपासच्या परिसरातील सर्व खोराडी नाला, आगलाई नाला, अभागा नाला असे अनेक लहान मोठ्या नाल्याकाठच्या आसपासच्या जमिनीतील सर्व पीकं पावसाच्या पाण्याने जळून गेले आहे . अनेक शेतकरी आपल्या पिकाच्या लागवडीसाठी लागणारा खर्च पण निघणार नाही, त्यामुळे लाखपूरी सर्कलमधील मंगरूळ कांबे, शेलूनजीक, दातवी, लाईत, दताळा जांभा खुर्द जांभा बु .उम इ, जितापूर नाकट, रसलपूर दताळा भटोरी पारद सांगवामेळ, घुंगशी, मुंगशी, विरवाडा या परिसरातील पिकाचे अतोनात नुकसान झाले असून ही नुकसान भरपाई शासनाने मंजूर करणे आवश्यक आहे या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अकोला मा.अजित कुंभार यांनी १९ ऑगस्ट रोजी लाखपुरी सह लाखपुरी सर्कलमधील अनेक गावांना भेट दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांचे झालेले नुकसान पाहिले तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून शासनस्तरावर मदतीसाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या पाहणी दौऱ्यात उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार, जिल्हा कृषी अधिकारी शंकर किरवे, तहसीलदार शिल्पा बोबडे, तालुका कृषी अधिकारी दीपक तायडे, सरपंच राजप्रसाद कैथवास, कृषी अधिकारी के.व्ही. वानखडे, मंडळ अधिकारी राजेंद्र जाधव, तलाठी वीरेंद्र वानखडे, महसूल सेवक आरती कैथवास, यांच्यासह लाखपुरी सर्कलमधील अनेक शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या पिकांचे हजारो हेक्टरवरील झालेले नुकसान व घरांच्या पडझडीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.



