महाराष्ट्रसामाजिक

जाहीर सुचनानदी काठच्या गावांतील नागरिकांना सावधतेचा ईशारा ! काटेपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष”, २४ तासात काटेपूर्णा प्रकल्पाचे द्वार उघडून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येऊ शकतो.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस.
विज घोडे प्रतिनिधी

दि.१ ऑगस्ट; आज दि. १/०८/२०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजता काटेपूर्णा प्रकल्पाची पाणी पातळी ३४६.५३ मी असून त्याचा साठा ६८.१७१ द.ल.घ मी त्याची टक्केवारी ७८.९४% पाणीसाठा झाला आहे. काटेपूर्णा प्रकल्पाच्या मंजूर जलाशय परिचालन आराखड्या नुसार प्रकल्पामध्ये १५ ऑगस्ट अखेर ८५.००% पाणीसाठा असणे निर्धारित आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असून धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने येणाऱ्या २४ तासात काटेपूर्णा प्रकल्पाचे द्वार उघडून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येऊ शकते . येणाऱ्या येव्या नुसार वक्रद्वार उघडून करून पुराचे पाणी नदीपात्रामध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावे तसेच नदी पात्र ओलांडू नये. नदीकाठावरील गावांना आपल्या स्तरावरून सतर्क करण्यात यावे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button