शेतकरी शेतमजुरांसाठी स्वाभीमानी रस्त्यावर पायीयात्रेच्या मुक्कामात जाहीर सभांना उस्फुर्त प्रतिसाद

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलढाणा जिल्हा ग्रामिण प्रतीनीधी ऋषिकेश देठे
शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मकेल्श परिवर्तन पायी यात्रेला गावागावातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, शेगाव तालुक्यातील पाळसुळ गावातील शेतकऱ्यांनी तर गावातून वर्गणी करत या शेतकऱ्यांच्या यात्रेला ८ हजाराची रोख मदत देऊन संवेदनशीलतेचा परिचय दिला ३ जानेवारी रोजी शेगाव येथून सुरुवात झालेली यात्रा काल गायेगाव, चिंचोली, मानेगाव, झाडेगाव तर आज तिसरी दिवशी पाळोदी, आडसूळ, पाडसूळ , कालखेड, पहुरपुर्णा या गावातून फिरली प्रत्येक गावात या पायी यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे , स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या या पायीयात्रेचे प्रत्येक गावा गावात वाजत गाजत स्वागत होत आहे, सभा बैठकांच्या माध्यमातुन अनेक शेतकरी यात सहभागी होऊ सरकार वर आपला रोष व्यक्त करत असल्याचे दिसून येते आहे, उद्या शनिवारी ही पायीयात्रा संग्रामपुर तालुक्याच्या शिवारात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले, संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी या पायी यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी करून ठेवली आहे , संग्रामपूर, शेगाव, जळगाव , या तीनही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन ही आत्मकलेश परिवर्तन पायी यात्रा मार्गक्रमण करत आहे, गावागावातील चौकात या पायी यात्राचे औक्षण महिला मंडळी करत असल्याने या यात्रेच्या उपक्रमाला एक संवेदनशीलतीची किनार लाभली आहे, दररोज २५ ते २८ किलोमीटरचा पायी प्रवास यात्रेतील कार्यकर्ते करत आहेत, प्रत्येक दिवसाच्या सकाळ संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था त्या त्या गावातील शेतकरी करत आहेत, ३ दिवस शेगाव तालुक्यात या पायी यात्रेचा मुक्काम राहिला या दरम्यान शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला हे उल्लेखनीय.




