खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

जळगाव जिल्हा दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलेले आश्वासनाची पूर्तता करा काँग्रेसचे निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुक्ताईनगर येथे मा. तहसीलदार साहेब त्यांचेमार्फत माननीय मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन देऊन जळगाव जिल्हा दुष्काळी जाहीर करावा व केळी पिक विमा ची रक्कम व कर्जमाफी बाबत दिलेले आश्वासन विनाशर्त तत्काळ पूर्ण करावे असे निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस VJNT विभागाचे प्रदेश सचिव अनिल वाडीले, शेख भैय्या शे करीम, किरण धायले व शेतकरी बांधव.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कधी अतिवृष्टी, कधी गारपीट, निसर्गाची अवकृपा, रासायनिक खतांचे गगनाला भीडलेले भाव, मजुरांची टंचाई, विजेची समस्या,शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव नाही,हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावून नेला आहे या सर्व गोष्टींमुळे शेतकरी हतबल , हताश, कर्जबाजारी झाला आहे.
शेतकऱ्यांना वेळोवेळी सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केलेली नाही, सरकारने जाहीर केली कर्जमाफी अजून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही, शेतकऱ्यांना अतिवृष्टी मुळे, वादळी पावसामुळे, गारपिटी मुळे, पिकांवर आलेल्या रोग रायमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळाली नाही, शेताच्या बांधावर राज्याचे मंत्री, केंद्रीय मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे पदाधिकारी यांनी भेटी देऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली व सरकारी यंत्रणा महसूल विभाग व कृषी विभागाने पंचनामे देखील केले परंतु शेतकऱ्यांच्या हाती दमडी सुद्धा मिळाली नाही,घोर निराशा आली आहे.
शेतकऱ्यांना केळी (खरीप/ रब्बी) पीक विमा योजनेचा लाभ अद्याप पर्यंत मिळालेला नाही अशा अनेक गोष्टीमुळे शेतकऱ्यांवर एक प्रकारे अन्याय होत आहे.
या सर्व गोष्टींमुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करून कोरडा दुष्काळ जाहीर करावा व नागरिकांना/ शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी तसेच नियमित कर्जदार शेतकऱ्यांना सुद्धा रु. 2 लाख रुपयाची कर्जमाफी करण्यात यावी तशी तरतूद करावी व केळी पीक विमाची रक्कम सप्टेंबर अखेर खात्यात जमा करण्यास विमा कंपनीस आदेश सरकारच्या वतीने व्हावे,दिलासा द्यावा

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button