बुलढाणा

जळगाव जामोद येथे खरीप पूर्व आढावा सभा व शेतकरी प्रशिक्षण – आधुनिक शेती तंत्रज्ञानावर भर…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

जळगाव जामोद:- २० एप्रिल २०२६
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत “कृषी तंत्रज्ञानाचा जागर – खरीप हंगाम मोहीम २०२६” अंतर्गत खरीप पूर्व आढावा सभा व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार, दि. २१ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. हा कार्यक्रम नगर परिषद येथील “योगा हॉल” येथे संपन्न होणार असून परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आमदार डॉ. संजयजी कुटे साहेब राहणार असून मार्गदर्शन मा. श्री. संतोष डाबरे (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक, आत्मा बुलडाणा) यांचे लाभणार आहे. तसेच प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. शैलेश काले (उपविभागीय अधिकारी), मा. श्री. पवन पाटील (तहसीलदार, जळगाव जामोद), मा. श्री. दीपक बडे (प्रकल्प संचालक, स्मार्ट प्रकल्प बुलडाणा) व मा. श्री. प्रशांत पाटील (तहसीलदार, संग्रामपूर) उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे संयोजन मा. श्री. सुरज जाधव (मुख्याधिकारी, नगर परिषद जळगाव जामोद) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
कार्यक्रमात कृषी तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. यामध्ये हवामान बदलानुसार पिक व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग नियंत्रण पद्धती, जैविक शेती, पीक विमा योजना, तसेच आधुनिक बाजार व्यवस्थापन यासारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मा. प्रा. संजय उमाळे, मा. प्रा. अनिल गाभने, मा. श्री. रमेश जाधव, मा. श्री. अवीनाश गाडगे, मा. श्री. रवींद्र जाधव व मा. श्री. विजय अस्वार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, उत्पादन वाढवून आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार असून खरीप हंगामासाठी योग्य नियोजन करण्यास मदत होणार आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button