नागपूर येथून भीमा कोरेगाव पर्यंत पायी पेटती मशाल घेऊन

प्रतिनिधी
नागपूर येथून भीमा कोरेगाव पर्यंत पायी पेटती मशाल घेऊन 14 ते 15 तरुण भीमसैनिक आपल्या पूर्वजांच्या शौर्याचे प्रतिक असलेल्या विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी निघाले.त्यांचा आज अकोला जिल्ह्यात अशोक वाटिका अकोला येथे आगमन झालं त्यांना आम्ही भेट देऊन या भीमसैनिकांना जाण्यासाठी आमच्याकडून थोडीशी आर्थिक मदत करून या भीमसैनिकांच्या धाडसी कार्याला त्यांच्या प्रवासाला आम्ही शुभेच्छा दिल्या व अनेक तरुण पिढीने या भीमसैनिकांचा आदर्श घेतला पाहिजे आंबेडकर चळवळ गतिमान केली पाहिजे यासाठी या तरुण पिढीने भीमसैनिकांना सहकार्य केले पाहिजे ज्या 500 शूरवीर महार सैनिकांनी आपल्या गळ्याचे गाडगे आणि कमरीचाच झाडू काढला त्या पाचशे शूरवीरांच्या बलिदानाचा आत्मचिंतन आपण भीमसैनिकांनी रोज आठवण करून यावर विचार केला पाहिजे आत्मसन्मानासाठी ते पाचशे शूरवीर एकूण या माजलेल्या व्यवस्थेशी कसे लढले या महार शूरवीराची आपण अवलाद आहोत याचा भान आजच्या भीमसैनिकांना असला पाहिजे. या शूरवीरांपासून आपला निर्माण झालेला संघर्ष पुन्हा या महाराष्ट्रात निर्माण केला पाहिजे हे आव्हान करतो आणि या तरुण पिढीने जो पुढाकार घेतला त्या तरुण पिढीला मी क्रांतिकारी जय भिम करतो प्रत्येक भीमसैनिकांनी या तरुण पिढीला सहकार्य केले पाहिजेत हे आवाहन करतो.!!
🇪🇺.जय भिम.🇪🇺
सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य
आकाश दादा शिरसाट
500 महार शूरवीर सैनिक अमर रहे



