बुलढाणामहाराष्ट्र

बचत गट प्रदर्शनी ची जय्यत तयारी दिशा फेडरेशनचे आयोजन! कार्यक्रमास्थळी जयश्रीताई शेळके यांनी केली पाहणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या वतीने ४ व ५ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय महिला उद्योजक तथा बचत गट प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असून २९ ऑक्टोबर रोजी संस्थापक अध्यक्ष जयश्री शेळके यांनी कार्यक्रमासाठी भेट देऊन तयारीची पाहणी केली.
येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्रांगणात ही बचत गट प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे.
कार्यक्रमास्थळी उभारण्यात येणारे मुख्य स्टेज, सभा मंडप, लोकप्रतिनिधीची व मान्यवर मंडळींची बैठक व्यवस्था, येण्या- जाण्याचे मार्ग, बैठक व्यवस्था, लावण्यात येणारे विविध स्टॉल याबाबतच्या नियोजनाची माहिती जयश्रीताई शेळके यांनी जाणून घेतली. कार्यक्रमास येणाऱ्या नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच कार्यक्रमास्थळी पाणी वाहन तळ, कचरापेटी यासह इतर सुविधांचे व्यवस्थित नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन सोबत जिल्ह्यातील १४०० बचत गट जुळलेले आहेत. फेडरेशनच्या माध्यमातून या बचत गटांना अर्थसहाय्य, बाजारपेठ, प्रशिक्षण, मार्गदर्शन, जाहिरात आधी सुविधा पुरविण्यात येतात. याद्वारे अनेक महिलांनी स्वतःचे व्यवसाय उभारून प्रगती साधली आहे. दिशा फेडरेशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय बचत गट प्रदर्शनी जवळपास २०० स्टॉल लावण्यात येणार आहेत. उद्घाटन कार्यक्रमाला प्रचंड संख्येने महिला उपस्थित राहणार आहेत. अनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button